

व्हॅलीशिल्प येथील मुख्य रस्त्याच्या कामाला मंजुरी
खारघर, ता. ४ (बातमीदार ) : पालिकेत नुकत्याच पार पडलेल्या सर्वसाधारण सभेत खारघर, सेक्टर ३६ मधील स्वप्नपूर्ती गृहसंकुल व व्हॅलीशिल्प या मुख्य रस्त्याच्या कामाला तसेच खारघरमध्ये पावसाळ्यात तुंबणारे पाणीउपसा कामाला मंजुरी दिल्यामुळे नागरिक समाधान व्यक्त करीत आहे.
खारघर कुटक बांधन गावाकडून सेक्टर ३६ मधील सिडकोच्या स्वप्नपूर्ती व व्हॅलीशिल्प गृहसंकुलाकडे जाणाऱ्या मुख्य रस्त्याची दुरवस्था झाली आहे. या संकुलात जवळपास १५ हजार रहिवासी वास्तव्य करीत आहेत. याशिवाय या रस्त्यावर जलवाहिनीच्या खोदकामामुळे खड्डे पडले होते. विशेष म्हणजे सेक्टर ३६मध्ये खासगी शाळा तसेच पनवेल उप प्रादेशिक परिवहनचे कार्यालय असल्यामुळे नागरिकांची वर्दळ मोठ्या प्रमाणात आहे. त्यात मुख्य रस्त्याची दुरवस्था झाली होती. पालिका प्रशासनाने ही रस्ते दुरुस्त करावी, अशी मागणी होती. पालिका प्रशासनाने सेक्टर ३६ मधील रस्ते पुनर्पुष्टीकरण करण्याचा कामाला मंजुरी दिली आहे. याशिवाय खारघर सेक्टर १०, खारघर रेल्वे स्थानक तसेच खारघरमध्ये पावसाळ्यात तुंबणारे पाणीउपसा कामाला मंजुरी दिल्यामुळे नागरिक समाधान व्यक्त करीत आहे.
ही सभा क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात नुकतीच महापौर नितीन पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झाली. या वेळी उपमहापौर प्रमिला पाटील, आयुक्त मंगेश चितळे, अतिरिक्त आयुक्त गणेश शेटे, महापालिका सचिव नानासाहेब कामटे उपस्थित होते. सभागृहात सभागृह नेते ॲड. प्रकाश बिनेदार, स्थायी समिती सभापती बबन मुकादम, महिला व बालकल्याण समिती सभापती ममता म्हात्रे, विरोधी पक्षनेते अरविंद म्हात्रे उपस्थित होते.
चौकट : खारघर येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या नवीन इमारतीमध्ये डायलिसिस सेंटरमधील रुग्णांसाठी मेडिकल गॅस पाइपलाइनच्या कामाकरिता ई निविदेच्या कामाला मंजुरी देण्यात आली आहे. त्यामुळे पालिकेच्या आरोग्य केंद्रात पुढील काही महिन्यांत डायलिसिस सुविधा उपलब्ध होणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.