

सकाळ वृत्तसेवा
डोंबिवली, ता. ४ : यंदा अल निनो व हिंदी महासागरातील द्विध्रुव (आयओडी)च्या प्रभावामुळे पावसाळा उशिरा येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे संभाव्य पाणीटंचाई टाळण्यासाठी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने (एमआयडीसी) नियोजित पाणीकपातीचा निर्णय घेतला आहे. याचा परिणाम डोंबिवली व तळोजा औद्योगिक क्षेत्रांसह कल्याण-डोंबिवली आणि उल्हासनगर महापालिका हद्दीत, तसेच परिसरातील ग्रामपंचायतींवर होणार आहे.
एमआयडीसीच्या बारवी (जांभूळ) जलशुद्धीकरण केंद्रातून होणारा पाणीपुरवठा ७ मे दुपारी १२ ते ८ मे दुपारी १२ आणि २१ मे दुपारी १२ ते २२ मे दुपारी १२ या कालावधीत प्रत्येकी २४ तासांसाठी पूर्णपणे बंद राहणार आहे. याशिवाय ९ मे आणि २३ मे रोजी पाणीपुरवठा कमी दाबाने होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. जलसंपदा विभागासोबत २३ एप्रिलला झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर आधीच पाणीटंचाईची तीव्रता जाणवत असताना या नियोजित कपातीमुळे नागरिक आणि उद्योग क्षेत्राला काही प्रमाणात अडचणींचा सामना करावा लागू शकतो. त्यामुळे नागरिकांनी पाण्याचा योग्य साठा करून वापरात काटकसर करावी, असे आवाहन एमआयडीसीकडून करण्यात आले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.