

कवयित्री संगीता अरबुनेंना साहित्य पुरस्कार
वसई, ता. ४ (बातमीदार) : वसईच्या कवयित्री संगीता अरबुने यांच्या ‘एकसोबीस हरी पत्ती लौंग आणि मी’ या शब्दालय प्रकाशित ललित लेखसंग्रहाला ‘ शिवांजली साहित्यपीठ’ पुणे या संस्थेने शिवांजली साहित्य सन्मान पुरस्कार देऊन सन्मानित केले. चाळकवाडी जिल्हा पुणे येथे स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे माजी कुलगुरू पंडित विद्यासागर यांच्या हस्ते तसेच ज्येष्ठ साहित्यिक केशव देशमुख, संस्थेचे प्रवर्तक शिवाजी चाळक यांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडला.
साहित्य वर्तुळात या पुस्तकाची चर्चा असून, वाचकांचादेखील या पुस्तकाला प्रतिसाद मिळत आहे. सहज संवादी, प्रवाही आणि संवेदनशील लेखनशैली हे या संग्रहाचं वैशिट्य आहे हा संग्रह म्हणजे ग्रामसंस्कृतीचा, लोकजीवनाचा आणि प्रादेशिक बोलीभाषेचा एक महत्त्वपूर्ण दस्तावेज आहे. अशा शब्दात या वेळी साहित्यिकांनी या संग्रहाचा गौरव केला असे कवयित्री संगीता अरबुने यांनी सांगितले. त्यांना मिळालेल्या पाचव्या पुरस्काराबद्दल पालघर जिल्ह्यातून अभिनंदन केले जात आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.