डॉ. बाबासाहेबांच्या नामफलकावर नेत्यांची छायाचित्रे

डॉ. बाबासाहेबांच्या नामफलकावर नेत्यांची छायाचित्रे
Published on

डॉ. बाबासाहेबांच्या नामफलकावर नेत्यांची छायाचित्रे
वंचितचा महापालिकेत ठिय्या आंदोलन


भाईंदर, ता. ४ (बातमीदार) : भाईंदर पश्चिम येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगरमधील प्रवेशद्वारावर असलेल्या डॉ. बाबासाहेबांच्या नामफलकाच्या कमानीवर महापौर व आमदार यांची छायाचित्रे लावण्यात आल्याने स्थानिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. या गोष्टीचा निषेध म्हणून वंचित बहुजन आघाडीच्या वतीने सोमवारी (ता.४) मिरा-भाईंदर महापालिकेत ठिय्या आंदोलन करण्यात आले.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगर येथील प्रवेशद्वारावर असलेला बाबासाहेबांचा नामफलक झाकला जाईल अशा पद्धतीने फलक लावण्यात आला असून, त्यावर महापौर डिंपल मेहता व आमदार नरेंद्र मेहता यांची छायाचित्रे आहेत. यामुळे आंबेडकरी अनुयायांच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत. हा प्रकार त्यांना आवडला नाही. त्याचप्रमाणे छायाचित्रे असलेले फलकदेखील अनधिकृत असल्याने संबंधितांवर महाराष्ट्र विदरूपीकरण प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी करत वंचित बहुजन आघाडीच्या वतीने करण्यात आली. जोपर्यंत गुन्हा दाखल होऊन त्यांची प्रत दिली जात नाही, तोपर्यंत ठिय्या आंदोलन मागे घेतले जाणार नाही, असे आघाडीने जाहीर केले होते.

महापौर डिंपल मेहता यांनी मात्र हा फलक आपण लावला नसून तो कोणी लावला आहे, त्याची आपल्याला माहिती नसल्याचे सांगितले. आम्ही डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना मानणारे लोक आहोत. आपण याआधी महापौर असताना शहरात अनधिकृत फलक मुक्त राहावे यासाठी ठराव मंजूर केला आहे. त्यामुळे ज्यांनी अनधिकृत फलक लावला आहे, त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे, अशी प्रतिक्रिया महापौरांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com