शेती व्यवसायात आमुलाग्र बदल गरजेचा- कृषी सभापती वैकुंठ पाटील

शेती व्यवसायात आमुलाग्र बदल गरजेचा- कृषी सभापती वैकुंठ पाटील
Published on

शेती व्यवसायात आमूलाग्र बदल गरजेचा
कृषी सभापती वैकुंठ पाटील यांचे प्रतिपादन
पेण, ता. ४ (वार्ताहर) : जिल्ह्यासह तालुक्यातील शेतकरी अधिक विकसित होऊन तालुका पुरस्कारापुरता मर्यादित न राहता तो राज्य पुरस्कारापर्यंत पोहोचला पाहिजे, या उद्देशाने येत्या काळात शेती व्यवसायात आमूलाग्र बदल आणावा लागेल, असे प्रतिपादन जिल्हा परिषदेचे कृषी व पशुसंवर्धन सभापती वैकुंठ पाटील यांनी पेण येथे केले. पंचायत समिती पेण व तालुका कृषी अधिकारी कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने तालुकास्तरीय कृषी मेळाव्याचे आयोजन सोमवारी (ता. ४) आगरी समाज सभा सभागृह पार पडला.
या मेळाव्याला आमदार रवींद्र पाटील, जिल्हा परिषद सभापती वैकुंठ पाटील, पंचायत समिती सभापती स्मिता पाटील, उपसभापती संजय डंगर, कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती महादेव मानकर, जिल्हा परिषद सदस्य प्रभाकर म्हात्रे, जनार्दन भस्मा, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी रुपाली सातपुते, कर्जतचे कृषितज्ज्ञ डॉ. सागवेकर, पेण कृषी अधिकारी सागर वाडकर आदींसह पंचायत समिती सदस्य तसेच शेतकरी उपस्थित होते. या वेळी पेण तालुक्यातील प्रगतिशील शेतकऱ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मान करून अनेक शेतकऱ्यांना कृषी साहित्याचे वाटप करण्यात आले.

कृषी सक्षमीकरण आवश्यक
रायगड जिल्हा हे भाताचे कोठार म्हणून संबोधले जायचे, परंतु आताची परिस्थिती फार वेगळी आहे. अनेक नैसर्गिक आपत्ती येत असताना शेतीची फार मोठी हानी होत चालली आहे. त्यामुळे शेती व्यवसायाकडे शेतकरीवर्ग कमी प्रमाणात वळला आहे. परंतु शेतकऱ्यांनी असे न करता शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेत शेतीला अधिक पसंती द्यावी, असे आवाहन या वेळी आमदार रवींद्र पाटील यांनी केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com