

सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. ४ : दिवसेंदिवस तापमानात होणाऱ्या वाढीमुळे वीजवाहिनी तापून शॉर्टसर्किट होऊन आग लागणे अथवा अन्य कारणाने आग लागण्याच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. अशातच ठाणे शहरातील नौपाडा आणि स्थानक परिसरात लागलेल्या आगीच्या घटनांमध्ये अग्निशमन दलाच्या प्रतिसाद वेळेबाबत दक्ष नागरिक संगम डोंगरे यांनी नाराजी व्यक्त केली आहे. यासंदर्भात त्यांनी महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी निवेदन देत यावर तोडगा काढण्याची मागणी केली आहे.
नौपाडा परिसरात २० एप्रिलला कपड्यांच्या दुकानाला भीषण आग लागली होती. हा भाग अत्यंत गजबजलेला असल्याने आगीची तीव्रता मोठी होती. दुकानमालकाने जवळच्या जवाहर बाग अग्निशमन केंद्रावर धाव घेतली असता ते केंद्र बंद असल्याचे समोर आले. त्यानंतर मनीषा नगर केंद्रावरून मदत मिळेपर्यंत दुकानातील संपूर्ण माल जळून खाक झाला. त्यानंतर २३ एप्रिलला सॅटीस पुलावर उभी असलेल्या शिवशाही बसला आग लागली. स्थानक परिसरात मोठी वर्दळ असतानाही अग्निशमन दलाला घटनास्थळी पोहोचण्यास विलंब झाला.
जवाहर बाग अग्निशमन केंद्र रुस्तमजी परिसरात स्थलांतरित करण्यात आले आहे. त्यामुळे सुमारे तीन ते चार किमी अंतर वाढले असून, शहरातील कोंडीमुळे गाड्यांना वेळेत पोहोचणे कठीण होत आहे. नौपाडा मार्केट व स्थानक परिसर हा ठाण्यातील सर्वाधिक वर्दळीचा भाग मानला जातो. येथे दररोज लाखो नागरिक, प्रवासी व व्यापाऱ्यांची ये-जा असते. अशा दाट वस्तीच्या भागात आगीसारख्या दुर्घटना घडल्यास काही मिनिटांचा विलंबही मोठ्या आर्थिक नुकसानीसह जीवितहानीला कारणीभूत ठरू शकतो.
आंदोलनाचा इशारा
दादोजी कोंडदेव स्टेडियम किंवा त्याच्या आसपासच्या परिसरात कायमस्वरूपी किमान तीन ते चार अग्निशमन गाड्या तैनात करण्यात याव्यात. तसेच बंद करण्यात आलेल्या केंद्रामुळे निर्माण झालेली गैरसोय दूर करण्यासाठी तातडीने ठोस उपाययोजना कराव्यात. या पार्श्वभूमीवर प्रशासनाने परिस्थितीचे गांभीर्य ओळखून त्वरित पावले उचलावीत, अन्यथा नागरिकांच्या हितासाठी तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही त्यांनी दिला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.