

मुंबई-अहमदाबाद महामार्गावर
रसायनाने भरलेला टँकर उलटला
कासा, (बातमीदार) ता. ४ : मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरील अंबोली येथे रविवारी (ता. ३) सायंकाळी सहाच्या सुमारास अत्यंत ज्वलनशील व विषारी रसायन वाहतूक करणारा टँकर उलटल्याची दुर्घटना घडली. या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही; मात्र संभाव्य मोठा अनर्थ टळल्याने प्रशासनाने सुटकेचा नि:श्वास टाकला.
मिळालेल्या माहितीनुसार, जेएनपीए बंदरातून अंकलेश्वरकडे सुमारे २५ टन कार्बन डाय सल्फाईड हे धोकादायक रसायन घेऊन जाणारा आयएसओ कंटेनर टँकर अंबोली परिसरात आला असता हा अपघात झाला. चालकाने पुढील वाहनाला वाचवण्याच्या प्रयत्नात टँकर सर्व्हिस रोडकडे वळवला; परंतु तेथील खड्ड्यामुळे टँकरचा तोल गेला आणि तो उलटला. घटनेची माहिती मिळताच पोलिस अधिकारी अनिल व्हटकर आणि त्यांच्या पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी संबंधित यंत्रणांना सतर्क केल्यानंतर ‘टीमा मार्ग’ संस्थेचे चेअरमन रवि भावसार व समन्वयक अरुण सावंत हेही तातडीने घटनास्थळी दाखल झाले. यानंतर रसायनतज्ज्ञांच्या देखरेखीखाली कंटेनरची पाहणी करण्यात आली. सुरक्षेच्या सर्व आवश्यक उपाययोजना करून तीन हायड्रा मशीनच्या सहाय्याने मध्यरात्रीनंतर सुमारे १.३० वाजण्याच्या सुमारास कंटेनर सुरक्षितरीत्या उचलण्यात आला. सर्व संबंधित यंत्रणांनी दाखवलेल्या तत्परतेमुळे संभाव्य मोठी दुर्घटना टळल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.