कारवाईतून पालिकेला लाखोंचा दंड वसूल

कारवाईतून पालिकेला लाखोंचा दंड वसूल
Published on

कारवाईतून पालिकेला लाखोंचा दंड वसूल

वाशी, ता. ४ (बातमीदार) : बेलापूर सेक्टर १५ परिसरातील हॉटेल, उपाहारगृहे आणि इतर व्यावसायिक आस्थापनांकडून सार्वजनिक जागांवर करण्यात येणाऱ्या अतिक्रमणाविरोधात महापालिकेने धडक कारवाई करीत लाखोंचा दंड वसूल केला आहे.
पदपथ, मार्जिनल स्पेस, सार्वजनिक मोकळी जागा तसेच पार्किंग क्षेत्रावर अतिक्रमण केल्याच्या तक्रारींची दखल घेत अतिक्रमण नियंत्रण विभागाने संबंधित आस्थापनांवर कारवाई सुरू केली. बेलापूर सेक्टर १५ येथील अनधिकृत हॉटेलधारकांना महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगररचना अधिनियम १९६६ अंतर्गत २०२१ पासून आतापर्यंत एकूण २६ नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. या कारवाईदरम्यान संबंधितांकडून रुपये २१ लाख ७५ हजार इतका दंड वसूल करण्यात आला. याशिवाय हॉटेल व इतर आस्थापनांकडून मार्जिनल स्पेसचा गैरवापर रोखण्यासाठी करण्यात आलेल्या कारवाईतून २०२३ पासून आतापर्यंत रुपये ४० लाख सात हजार ५०० इतकी दंडाची रक्कमही पालिकेच्या तिजोरीत जमा झाली आहे. महापालिकेकडून अशा अतिक्रमणांविरोधात पुढेही कठोर कारवाई सुरू ठेवली जाणार असून, नियमांचे उल्लंघन करणाऱ्या आस्थापनांवर दंडात्मक व प्रतिबंधात्मक उपाययोजना अधिक तीव्र केल्या जाणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com