

पालिका सभागृहात
विजयाच्या जल्लोष
मुंबई, ता. ४ ः पश्चिम बंगाल, आसाम व पुदुच्चेरी या तीन राज्यात भाजपला घवघवीत यश मिळाल्याने सभागृहात अभिनंदनाचा प्रस्ताव पालिकेचे सभागृहनेते गणेश खणकर यांनी माडला. दरम्यान, भाजपच्या विजयानंतर सभागृहात ‘मोदी मोदी’, ‘वंदे मातरम्’, ‘जय श्रीराम’, ‘भारतमाता की जय’ अशा घोषणांनी सभागृह दणाणून सोडले. सभागृहात यायला महापौर आणि सत्ताधारी पक्षाच्या सदस्यांना उशीर झाला. त्यामुळे विरोधीपक्ष नेत्या किशोरी पेडणेकर यांनी महापौरांच्या खुर्चीत बसण्याचा प्रतत्न केला. त्यामुळे सभागृहात गदारोळ झाला.
पालिका सभागृहात सभा सुरू होण्यापूर्वी सभागृहात विरोधी पक्ष नेत्यासह काँग्रेस, मनसे, सपाचे नगरसेवक उपस्थित होते; मात्र महापौर व भाजप महायुतीचे नगरसेवक उपस्थित नसल्याने विरोधकांनी घोषणाबाजी करत विरोधी पक्ष नेत्या किशोरी पेडणेकर यांनी महापौरांच्या खुर्चीत बसण्याचा प्रयत्न केला. तसेच सगळीकडे हिंदू शब्दाचा वापर करु नका, अशा शब्दात पेडणेकर यांनी सत्ताधारी पक्षाला ठणकावले. त्यानंतर तीन राज्यात भाजपला घवघवीत यश मिळाल्याने सभागृहात अभिनंदनाचा प्रस्ताव मांडला. बंगालच्या निवडणुकीतील यश आमच्यासाठी ऐतिहासिक आहे. बंगालच्या निवडणुका लोकशाहीच्या मार्गाने जिंकल्या. आता जो बदल झालाय तो अनेकांची इच्छा असेल किंवा नसेल पण पाचवावे लागेल, असा टोला सभागृह नेते गणेश खणकर यांनी विरोधकांना लगावला.
-------
महापौरांच्या खुर्चीत बसले तर काय चुकलं
सभागृह नेहमीच उशिराने सुरू होत आहे. त्यातच चार दिवसापूर्वी स्थायी समिती अध्यक्षांना महापौरांच्या खुर्चीत बसवण्यात आले. महापालिका सभागृहात महापौर आणि उपमहापौर यांच्या अनुपस्थितीत परंपरेनुसार माजी महापौर यांना पिठासीन अधिकारी म्हणून बसवण्यात येते; मात्र भाजपने सभागृहात ही परंपरा मोडीत काढली आणि स्थायी समिती अध्यक्ष प्रभाकर शिंदे यांना महापौरांच्या खुर्चीत बसविले. मग आम्ही महापौरांच्या खुर्चीत बसलो तर कुठे चुकले, असा सवाल विरोधी पक्षनेत्या किशोरी पेडणेकर यांनी सांगितले.
-------------
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.