

विद्यापीठाने आंदोलकांना
अतिरेक्यांसारखे वागवू नये!
उच्च न्यायालयाने फटकारले
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ४ : आपल्या मागण्यांसाठी विद्यापीठात आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना विद्यापीठाने अतिरेक्यांसारखे वागवू नये, अशा शब्दांत सोमवारी (ता. ४) उच्च न्यायालयाने मुंबई विद्यापाठीला सुनावले. राजेश हे एक विद्यार्थी होते आणि त्यांना पीएचडी वेळेत पूर्ण न करता आल्याने त्यांच्या पदरी निराशा पडल्याचेही न्यायालयाने नमूद केले.
मुंबई विद्यापीठाच्या कलिना संकुलात अनेक महिन्यांपासून आंदोलन करणारे माजी विद्यार्थी राजेश बळखंडे ऊर्फ भदंत विमांसा यांनी न्यायालयाच्या आदेशानंतर रविवारी सायंकाळी विद्यापीठाचे संकुल सोडल्याची माहिती न्या. रवींद्र घुगे आणि न्या. हितेन वेणेगावकर यांच्या खंडपीठाला देण्यात आली. त्याची दखल घेऊन बळखंडेंनी न्यायालयाच्या आदेशाचे पालन म्हणून संकुल सोडले आहे. त्यामुळे बळखंडे यांना त्यांची कागदपत्रे हवी असल्यास त्यांनी विद्यापीठाच्या कुलसचिवांची पूर्वपरवानगी घ्यावी आणि केवळ नियोजित वेळेतच भेट द्यावी. बळखंडे यांच्या विनंतीला तीन दिवसांच्या आत प्रतिसाद देण्याचे आदेश न्यायालयाने कुलसचिवांना दिले आणि त्यांच्या आंदोलनाविरोधातील याचिका निकाली काढली.
---
आदोलनासाठी विशिष्ट जागेचा विचार करा
शांततापूर्ण मार्गाने आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी संकुलात विशिष्ट जागा निश्चित करण्याबाबत विचार करा, अशी सूचना न्यायालयाने सुनावणीदरम्यान विद्यापीठाला केली. एखादा विद्यार्थी संकुलातील कोपऱ्यात आंदोलन करीत असल्यास त्याचा आवाज संबंधितांपर्यंत पोहोचतच नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या आंदोलनासाठी विद्यापीठाने संकुलात विशिष्ट जागा निश्चित करावी. ही जागा संकुलातील पोलिस चौकीजवळ असल्यास आंदोलक विद्यार्थ्यांवर पोलिसही देखरेख ठेवू शकतील, असेही खंडपीठाने स्पष्ट केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.