मुलगा-सुनेकडून आईवर हल्ला

मुलगा-सुनेकडून आईवर हल्ला
Published on

सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. ६ : उसने घेतलेले मंगळसूत्र आणि पैंजण परत मागितल्याच्या रागातून मुलगा आणि सुनेने ५६ वर्षीय आईवर हल्ला केल्याची धक्कादायक घटना मुंब्रा परिसरात घडली. या मारहाणीत महिलेच्या डोक्याला गंभीर दुखापत होऊन टाके पडले आहेत. त्यांच्या दोन मुलींनाही मारहाण केल्याचे तक्रारीत नमूद आहे.
मुंब्रा येथील संजयनगर परिसरात राहणाऱ्या सईदा बी मोहम्मद मिया शेख (५६) यांनी याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. तक्रारीनुसार, त्यांचा मोठा मुलगा मोसीन शेख (३०) हा वेगळा राहत असून सण-समारंभासाठी आईचे मंगळसूत्र आणि पैंजण उसने घेऊन जात असे. यावेळीही पत्नी सबरीन हिला लग्नसमारंभासाठी दागिने घेऊन गेला होता; मात्र कार्यक्रमानंतरही दागिने परत केले नव्हते. यामुळे सईदा यांनी अनेकदा मुलाच्या घरी जाऊन दागिने मागितले. दरम्यान, २ मे रोजी सायंकाळी ७ च्या सुमारास मोसीन आणि त्याची पत्नी सबरीन हे दोघे सईदा यांच्या घरी आले. त्यावेळी पुन्हा दागिन्यांबाबत विचारणा केल्यानंतर दोघांनी दागिने परत देण्यास नकार दिला. त्यानंतर पोलिसांत तक्रार करण्याचा इशारा दिल्याने संतप्त झालेल्या मोसीन आणि सबरीन यांनी सईदा यांना मारहाण करण्यास सुरुवात केली. तसेच, सबरीन हिने सईदा यांच्या डोक्यात दगड मारल्याने रक्तस्त्राव सुरू झाला. यावेळी घरातील वस्तूंची तोडफोड केली, असे तक्रारीत म्हटले आहे. वाद सोडविण्यासाठी मध्ये पडलेल्या सईदा यांच्या मुली शाहीन (२५) आणि विवाहित मुलगी सना खान (२८) यांनाही मारहाण केल्याचे तक्रारीत नमूद केले आहे.
जखमी सईदा यांच्या डोक्याला टाके पडले असून मुलींना किरकोळ दुखापत झाली आहे. याप्रकरणी मोसीन आणि सबरीनविरोधात गुन्हा दाखल झाला असून पुढील तपास वरिष्ठ पोलिस निरीक्षक अनिल शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com