रुग्णालय, प्रसुतिगृह पुनर्विकासाला गती द्या!

रुग्णालय, प्रसुतिगृह पुनर्विकासाला गती द्या!
Published on

रुग्णालय, प्रसूतिगृह पुनर्विकासाला गती द्या!
मुंबई : पश्चिम उपनगरातील नागरिकांना दर्जेदार व गुणवत्तापूर्ण वैद्यकीय सुविधा स्थानिक पातळीवर उपलब्ध व्हाव्यात, यासाठी रुग्णालये आणि प्रसूतिगृहांच्या पुनर्विकास प्रकल्पांना गती देण्याचे निर्देश अतिरिक्त महापालिका आयुक्त (पश्चिम उपनगरे) डॉ. विपिन शर्मा यांनी दिले. भारतरत्‍न डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापालिका सर्वसाधारण रुग्णालय आणि ओशिवरा प्रसूतिगृह येथे भेट देऊन मंगळवारी त्यांनी प्रगतीचा आढावा घेतला.

Marathi News Esakal
www.esakal.com