

शेअर ट्रेडिंगच्या माध्यमातून ७४ लाखांची फसवणूक
सायबर ठगांना बँक खाती पुरविणाऱ्या आरोपीस अटक
अंधेरी, ता. ६ (बातमीदार) ः शेअर ट्रेडिंगच्या माध्यमातून एका खासगी कंपनीच्या अधिकाऱ्याची ७४ लाखांची फसवणूक करणाऱ्या आरोपीस उत्तर सायबर सेल पोलिसांनी अटक केली. राजबहादूर मोहनलाल वर्मा असे या आरोपीचे नाव असून त्याच्यावर सायबर ठगांना बँक खाती पुरविल्याचा आरोप आहे.
तो सध्या पोलिस कोठडीत असून त्याची पोलिसांकडून चौकशी सुरू आहे. यातील तक्रारदार कांदिवलीतील रहिवासी असून एका खासगी कंपनीत सेल्स मॅनेजर म्हणून काम करतात. त्यांना शेअर ट्रेडिंगची माहिती जाणून घ्यायची होती, ऑनलाइन सर्च करताना त्यांना एका व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये त्यांना अॅड करण्यात आले होते. या ग्रुपमध्ये शेअर ट्रेडिंगबाबत मार्गदर्शन करताना ग्रुप अॅडमिन सभासदांना कुठल्या शेअरमध्ये गुुंतवणूक केल्यास जास्त फायदा होईल, याबाबत माहिती देत होते. त्यांच्या आमिषाला बळी पडून त्यांनी वेगवेगळ्या शेअरमध्ये सुमारे ७४ लाखाची गुंतवणूक केली होती.
या गुंतवणुकीवर त्यांना एक कोटी ६७ लाख रुपये इतका नफा झाला हेता. ही रक्कम त्यांनी काढण्याचा प्रयत्न केला असता त्यांना आणखीन ८८ लाख रुपये शेअरमध्ये गुंतवणुकीचा सल्ला देण्यात आला होता. त्यांनी ही रक्कम देण्यास नकार देताच त्यांनी त्यांना प्रतिसाद देणे बंद केले होते. फसवणुकीचा हा प्रकार लक्षात येताच राकेश सोमय्या यांनी उत्तर सायबर सेल पोलिसांत तक्रार केली होती. तक्रारीची शहानिशा केल्यानंतर अज्ञात सायबर ठगाविरुद्ध पोलिसांनी फसवणुकीसह आयटी कलमांतर्गत गुन्हा दाखल केला होता. गुन्हा दाखल होताच तांत्रिक माहितीवरून पोलिसांनी राजबहादूर वर्मा याला ताब्यात घेतले होते. तपासात तो काही सायबर ठगांच्या संपर्कात होते. त्यांच्याच सांगण्यावरून त्यांनी बँकेत खाते उघडले होते. या बँक खात्याची माहिती सायबर ठगांना दिल्यानंतर फसवणुकीची ही रक्कम त्यांच्या बँक खात्यात जमा झाली होती.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.