कांदिवलीतील नागदेव ओंकारेश्वर पार्कची दुरवस्था

कांदिवलीतील नागदेव ओंकारेश्वर पार्कची दुरवस्था
Published on

कांदिवलीतील नागदेव ओंकारेश्वर पार्कची दुरवस्था
मुलांच्या सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह

मालाड, ता. ६ (बातमीदार) : कांदिवली (पश्चिम) येथील चारकोप सेक्टर तीनमधील नागदेव ओंकारेश्वर मनोरंजन पार्कची दयनीय अवस्था समोर आली असून स्थानिक नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. पार्कमधील बिघडलेल्या सुविधांमुळे विशेषतः लहान मुलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे.
पार्कमध्ये बसविण्यात आलेले रबर मॅट पूर्णपणे निघून गेले आहेत. त्यामुळे खेळताना मुले पडून जखमी होण्याचा धोका वाढला आहे. तसेच झोपाळे, घसरगुंडी यांसारखी खेळणी मोडकळीस आल्याने पालकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.
नागरिक व ज्येष्ठांसाठी बसण्याची व्यवस्थादेखील खराब झाली आहे. पार्कमधील बॅंचेस तुटलेल्या अवस्थेत असून सिमेंटचे चौथरेही जीर्ण झाले आहेत. त्यामुळे नागरिकांची गैरसोय होत आहे. याशिवाय पार्कमध्ये बसविण्यात आलेल्या संगीत वाद्यांच्या प्रतिकृतीही तुटलेल्या अवस्थेत असल्याने परिसराच्या सौंदर्यावर परिणाम झाला आहे.
या सर्व समस्यांमुळे नागरिक त्रस्त झाले असून पार्कची तातडीने दुरुस्ती करण्याची मागणी जोर धरत आहे. दरम्यान, फाईट फॉर राईट फाउंडेशनचे अध्यक्ष विनोद पांडुरंग घोलप यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेत मनपा आर/मध्य विभागाच्या सहाय्यक आयुक्तांकडे ईमेलद्वारे लेखी तक्रार केली आहे.

तातडीने उपाययोजना करा!
पार्कमधील धोकादायक परिस्थिती लक्षात घेता महापालिका प्रशासनाने तातडीने उपाययोजना कराव्यात, अन्यथा एखादा अपघात घडण्याची भीती स्थानिक नागरिकांनी व्यक्त केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com