

जनगणना प्रशिक्षणाचे धडे
पालिकेकडून नियुक्त कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन
विरार, ता. ६ (बातमीदार) ः वसई-विरार शहर महापालिकेत जनगणना २०२७ अंतर्गत स्वगणना प्रक्रियेस सुरुवात झाली आहे. तर १६ मे पासून घरगणनेला होणार असल्याने क्षेत्रीय प्रशिक्षकांमार्फत प्रगणक, पर्यवेक्षकांना पालिकेकडून तीन सत्रांमध्ये प्रशिक्षण दिले जाणार आहे.
वसई-विरार शहर पालिकेतील नऊ प्रभाग समित्यांअंतर्गत शाळा/महाविद्यालयांमध्ये प्रशिक्षण दिले जाणार आहे. या कामासाठी वसई-विरार शहर पालिका क्षेत्रात एक मास्टर ट्रेनर, ९१ क्षेत्रीय प्रशिक्षक, ७१७ पर्यवेक्षक तसेच ४,२९८ प्रगणकांची नियुक्ती करण्यात आली आहे. देशातील पहिलीच डिजिटल जनगणना असल्यामुळे संबंधित पर्यवेक्षक व प्रगणकांना योग्य व अचूक प्रशिक्षण देण्यात येत आहे. प्रशिक्षणादरम्यान विशेष मोबाईल ॲपचा वापर, प्रश्नावलीचे सुलभीकरण तसेच डेटाची सुरक्षा तांत्रिक बाबींसोबतच नियुक्त पर्यवेक्षकांना ॲपच्या माध्यमातून कामकाजाचे प्रात्यक्षिक दाखवण्यात आले.
-------------------------
गैरहजर कर्मचारी रडारवर
जनगणना प्रशिक्षणास गैरहजर राहिलेल्या कर्मचाऱ्यांना विभागामार्फत नोटिसा देण्यात आल्या असून, त्यांच्यावर विभागामार्फत कारवाई प्रस्तावित करण्यात येत आहे. जनगणना २०२७ अंतर्गत १ ते १५ मे या कालावधीत नागरिकांना स्वगणना ही सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.