

रायगडात शरद पवार गटात फेरबदल
खासदार सुरेश म्हात्रे जिल्हा प्रभारी; उत्तर-दक्षिण विभागणीचा निर्णय
श्रीवर्धन, ता. ६ (बातमीदार) : आगामी निवडणुका आणि संघटनात्मक बांधणीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार) पक्षाने रायगड जिल्ह्यात मोठे फेरबदल करण्यास सुरुवात केली आहे. रायगडमध्ये पक्ष अधिक जोमाने वाढवण्यासाठी आणि कार्यकर्त्यांना ताकद देण्यासाठी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी भिवंडीचे विद्यमान खासदार सुरेश ऊर्फ बाळ्या मामा म्हात्रे यांची रायगड जिल्हा प्रभारी म्हणून नियुक्ती केली आहे. तसेच रायगड जिल्ह्याचे आता दक्षिण रायगड आणि उत्तर रायगड असे दोन विभाग करून दोन स्वतंत्र जिल्हाध्यक्षांची नियुक्ती करण्यात येणार असल्याची घोषणाही करण्यात आली आहे.
शुक्रवारी (ता. १) प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांच्या उपस्थितीत रायगड जिल्ह्याची आढावा बैठक पार पडली. या बैठकीत रायगड जिल्ह्याचा मोठा भौगोलिक विस्तार लक्षात घेता, पक्ष तळागाळापर्यंत अधिक प्रभावीपणे पोहोचावा यासाठी जिल्ह्याची संघटनात्मक पातळीवर दोन भागांत विभागणी केली जाणार आहे. यामध्ये दक्षिण रायगड आणि उत्तर रायगड असे दोन विभाग करून दोन्ही ठिकाणी स्वतंत्र आणि सक्षम जिल्हाध्यक्षांची नियुक्ती केली जाईल. प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी दिलेल्या स्पष्ट सूचनेनुसार, नवनियुक्त जिल्हा प्रभारी खासदार सुरेश म्हात्रे हे येत्या १५ दिवसांत या दोन्ही जिल्हाध्यक्षपदांच्या निवडीबाबत योग्य तो निर्णय घेऊन घोषणा करणार आहेत.
या सर्व धोरणात्मक निर्णयांचे रायगड जिल्हा संघटक तथा श्रीवर्धन विधानसभा अध्यक्ष अझहर धनसे यांनी जाहीर स्वागत केले आहे.
छायाचित्र : श्रीवर्धन : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार) गटाची बैठक.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.