प्रखर उष्णतेत आगप्रतिबंधासाठी खबरदारी घ्या

प्रखर उष्णतेत आगप्रतिबंधासाठी खबरदारी घ्या
Published on

प्रखर उष्णतेत आगप्रतिबंधासाठी खबरदारी घ्या!
अग्निशमन दलाकडून सतर्कतेचे आवाहन

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ६ ः उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये वाढत्या तापमानामुळे घरांमध्ये, कार्यालयांमध्ये तसेच व्यापारी आस्थापनांमध्ये विद्युत यंत्रणांवर ताण येऊन शॉर्टसर्किट, ओव्हरलोडिंग यांसारख्या कारणांमुळे आग लागण्याच्या घटनांमध्ये वाढ होण्याची शक्यता असते. त्यामुळे मुंबईकरांनी नियमांचे पालन करून खबरदारी घ्यावी, असे आवाहन मुंबई अग्निशमन दलाकडून करण्यात येत आहे.
मुंबईत महानगरात तापमान वाढत आहे. उन्हाळा प्रखरतेने जाणवत आहे. घरांमध्ये, कार्यालयांमध्ये तसेच व्यापारी संकुलांमध्ये पंखे, एअर कुलर, एअर कंडिशनर, फ्रिज व इतर विद्युत उपकरणांचा वापर मोठ्या प्रमाणात केला जात आहे. त्यामुळे आग लागण्याच्या घटनांमध्ये वाढ होण्याची शक्यता असते. याशिवाय उष्ण व कोरडे वातावरण, ज्वलनशील पदार्थाची अयोग्य साठवणूक, कचरा जाळणे तसेच गॅस गळती यांसारख्या कारणांमुळेही आग लागण्याचा धोका वाढू शकतो. ही बाब लक्षात घेऊन मुंबई अग्निशमन दलाने नागरिकांना सतर्क राहून आवश्यक खबरदारी घेण्याचे आवाहन केले आहे.

याची खात्री करा
- नागरिकांनी घरातील व इमारतीतील विद्युत वायरिंग, स्विच बोर्ड आणि प्लग पॉइंट्स यांची नियमित तपासणी करून त्यांच्या जोडणीबाबत खात्री करावी.
- एका प्लग पॉइंटमध्ये अनेक उपकरणे जोडून ओव्हरलोडिंगसारखे प्रकार टाळणे गरजेचे आहे.
- एअर कंडिशनर, कुलर इत्यादी उपकरणे वापरताना सुरक्षित व दर्जेदार विद्युत जोडणीचा वापर करावा.
- घरात किंवा परिसरात कचरा, झाडांची, वेलींची कोरडी पाने किंवा इतर ज्वलनशील वस्तू जाळू नये. एलपीजी गॅस सिलिंडर व गॅस पाइपची संबंधित तज्ज्ञांकडून नियमित तपासणी करावी.
- प्रत्येक इमारतीतील, घरातील व निवासी- अनिवासी दालनातील अग्निशमन यंत्रणा सुस्थितीत आहेत का, याची खबरदारी घ्यावी, अशा सूचना मुंबई अग्निशमन दलाने केल्या आहे.

आपत्कालीन मार्ग मोकळे ठेवा
इमारतींचे, व्यापारी संकुलांचे जिने तसेच आपत्कालीन बाहेर पडण्याचे मार्ग मोकळे ठेवावेत. जेणेकरून एखादी घटना घडल्यास नागरिकांना सुखरूप बाहेर पडता येईल. यासोबतच आपली वाहने निश्चित केलेल्या जागेत उभी करावीत. दुर्दैवाने कुठे आग लागण्याची घटना घडल्यास अग्निशमन दलाच्या वाहनांच्या मुक्त व सुरळीत हालचालीसाठी आवश्यक तेवढी पुरेशी जागा मोकळी ठेवावी, असे आवाहन मुख्य अग्निशमन अधिकारी रवींद्र आंबुलगेकर यांनी केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com