

अंबरनाथ, ता. ६ (वार्ताहर) : एमआयडीसीच्या जांभूळ जलशुद्धीकरण केंद्रामधील जलवाहिनीच्या तातडीच्या देखभालीसाठी आणि नियोजित पाणीकपातीमुळे अंबरनाथ, बदलापूर आणि उल्हासनगर शहरांचा पाणीपुरवठा २४ तास बंद राहणार आहे. गुरुवारी (ता. ७) दुपारी १२ वाजल्यापासून ते शुक्रवारी (८) दुपारी १२ वाजेपर्यंत हा पाणीपुरवठा खंडित राहील.
एमआयडीसीने दिलेल्या माहितीनुसार, आंध्रा व बारवी धरणातील पाण्याची सध्याची तूट आणि पुढील हंगामात पावसाचे कमी प्रमाण लक्षात घेता ३१ ऑगस्टपर्यंत पाण्याचे नियोजन करण्यासाठी ही कपात प्रस्तावित करण्यात आली आहे. यासोबतच जांभूळ जलशुद्धीकरण केंद्रातील गुरुत्ववाहिनी क्र. १, २ व ३ वरील तातडीचे देखभालीचे काम हाती घेण्यात येणार आहे. या कामामुळे अंबरनाथ शहर, बदलापूर औद्योगिक क्षेत्र, उल्हासनगर महापालिका, अंबरनाथ नगरपालिका, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण आणि परिसरातील ग्रामपंचायतींना होणारा एमआयडीसीचा पाणीपुरवठा बंद राहणार आहे. शुक्रवारी दुपारी १२ वाजल्यानंतर पाणीपुरवठा सुरू झाला तरी पुढील काही तास तो कमी दाबाने सुरू राहील. नागरिकांनी पाण्याचा वापर काटकसरीने करावा आणि सहकार्य करावे, असे आवाहन एमआयडीसीच्या अंबरनाथ विभागाचे कार्यकारी अभियंता एस. एस. ननवरे यांनी केले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.