चारकोपमधील चौकाची दुरवस्था

चारकोपमधील चौकाची दुरवस्था
Published on

चारकोपमधील चौकाची दुरवस्था
कारवाईची नागरिकांची मागणी

मालाड, ता. ७ (बातमीदार) : कांदिवली पश्चिमेच्या चारकोप परिसरातील स्वर्गीय माजी उपमुख्यमंत्री गोपीनाथ मुंडे यांच्या स्मरणार्थ एक चौक उभारण्यात आला आहे. दरम्यान, या सुसज्ज अशा चौकाची दुरवस्था झाली आहे. चारकोप, सह्याद्रीनगर आणि बंदर पाखाडी रस्त्यांच्या नाक्यावर असलेल्या या महत्त्वाचा चौकाच्या बोर्डावर सध्या अनधिकृत जाहिराती लावण्यात आल्याने तो विद्रूप झाल्याचे चित्र असून, याबाबत प्रशासनाने कारवाई करावी, अशी मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे.

आधुनिक साहित्याचा वापर करून उभारलेला हा चौक देखभालीअभावी खराब अवस्थेत गेला आहे. पालिकेच्या ‘आर दक्षिण’ विभागाकडून नियमित देखभाल होत नसल्याने नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. स्थानिक भाजप नगरसेवकांच्या पुढाकारातून हा चौक उभारण्यात आला होता. मात्र, त्यानंतर त्याच्या देखभालीकडे दुर्लक्ष झाल्याचा आरोप रहिवाशांनी केला आहे. ‘ ज्येष्ठ नेत्यांच्या स्मरणार्थ उभारलेले चौक जर अशा अवस्थेत असतील, तर अशा स्मारकांचा उपयोग काय,’ असा सवाल नागरिक उपस्थित करत आहेत. चौकाची तातडीने दुरुस्ती व स्वच्छता करून नियमित देखभाल करावी, अशी मागणी स्थानिकांकडून होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com