

रामनगरमधील गटाराच्या दुरुस्तीचे काम सुरू
घाटकोपर, ता. ७ (बातमीदार) ः पश्चिमेतील रामनगर (अ) परिसरात शंकर मंदिराशेजारी मुख्य गटार खचल्याने परिसरात धोकादायक परिस्थिती निर्माण झाली होती. याबाबत ‘सकाळ’च्या मंगळवारच्या (ता. ५) अंकात वृत्त प्रकाशित करण्यात आले होते. याची दखल घेत पालिकेने गटाराचे काम सुरू केले आहे.
एन विभागाचे उपायुक्त संतोषकुमार धोंडे, सहाय्यक आयुक्त मारुती पवार, प्रभाग क्रमांक १२७च्या स्थानिक नगरसेविका स्वरूपा पाटील यांनी तातडीने दखल घेत या मुख्य नाल्याच्या दुरुस्तीच्या बांधकामाला सुरुवात केली.
रामनगर हा परिसर डोंगराळ भागात येत असून पावसाळ्यात डोंगरातून गटारातून वाहत येणारे पाणी मोठ्या दाबाने खाली वाहत येते. अचानक खाली असलेले गटार कचऱ्याने भरल्यास हे सांडपाणी थेट रस्त्यावर वाहते. त्यामुळे नागरिकांना या नाल्याच्या बाजूने टेकडी परिसराकडे जाण्याची अडचण निर्माण होते. त्यात मुख्य गटार खचल्याने ते कधीही कोसळण्याची शक्यता होती. याबाबत स्थानिक नागरिक, येथील सामाजिक कार्यकर्ते केतन भोज यांनी पालिकेकडे दुरुस्तीबाबत मागणी केली होती.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.