कामोठ्यात शांततामय जनमोर्चाची हाक

कामोठ्यात शांततामय जनमोर्चाची हाक
Published on

पनवेल, ता. ६ (बातमीदार) : महापालिका क्षेत्रातील वाढत्या पाणीटंचाईच्या निषेधार्थ १७ मे रोजी कामोठे येथील पाणीपुरवठा केंद्रावर शांततामय जनमोर्चा काढण्याची घोषणा करण्यात आली आहे. या प्रकरणी प्रशासनाला याबाबत पूर्वसूचना देण्यात आली आहे.

पनवेल पालिका क्षेत्रातील २९ गावे, तसेच मुख्य शहरात सध्या तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली आहे. नागरिकांना अपुरा व अनियमित पाणीपुरवठा सहन करावा लागत आहे. महिलांपासून ते ज्येष्ठ नागरिक व विद्यार्थ्यांपर्यंत सर्वसामान्य जनतेला या समस्येमुळे मोठ्या हालअपेष्टा सहन कराव्या लागत आहेत. वाढती लोकसंख्या, नव्याने उभ्या राहणाऱ्या वसाहती, तसेच औद्योगिक व नागरी विस्तार यामुळे विद्यमान पाणीपुरवठा अत्यंत अपुरा ठरत आहे.

नवी मुंबई महापालिकेकडे सुमारे १०० एमएलडी अतिरिक्त पाणी उपलब्ध असल्याची माहिती समोर येत आहे. त्यापैकी किमान ३० एमएलडी पाणी पनवेल क्षेत्रासाठी तातडीने उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी वारंवार करण्यात आली आहे. यासंदर्भात महापौर, आयुक्त, विरोधी पक्षनेते तसेच उपमुख्यमंत्री व नगरविकास मंत्र्यांकडे निवेदन देऊनही अद्याप ठोस निर्णय न झाल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. या पार्श्वभूमीवर नागरिकांच्या मूलभूत हक्कासाठी व पाणीप्रश्नाकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी १७ मे रोजी सकाळी ११ वाजता कामोठे येथील पाणीपुरवठा केंद्रावर शांततामय जनमोर्चा व धरणे आंदोलन आयोजित करण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com