

नवी मुंबईत हायब्रिड स्मशानभूमी प्रकल्पाला गती
२.८७ कोटींच्या प्रकल्पावर शुक्रवारी निर्णय अपेक्षित
वाशी, ता. ६ (बातमीदार) : नवी मुंबई महापालिकेच्या हद्दीतील पारंपरिक स्मशानभूमींचे आधुनिकीकरण करण्यासाठी हायब्रिड स्मशानभूमी उभारण्याचा महत्त्वपूर्ण प्रस्ताव स्थायी समितीसमोर ठेवण्यात आला आहे. येत्या शुक्रवारी (ता. ८) होणाऱ्या बैठकीत या प्रस्तावावर अंतिम निर्णय होण्याची शक्यता असून, बैठक स्थायी समिती सभापती अशोक पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पार पडणार आहे.
महापालिका प्रशासनाने सादर केलेल्या प्रस्तावानुसार, पारंपरिक लाकूडआधारित अंत्यसंस्कारामुळे मोठ्या प्रमाणात वायू प्रदूषण होते तसेच लाकडाच्या वाढत्या खर्चामुळे नागरिकांवर आर्थिक ताण पडतो. या पार्श्वभूमीवर एलपीजी आणि आधुनिक वूडबेस्ड तंत्रज्ञानाचा वापर करणारी हायब्रिड प्रणाली उभारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या प्रणालीमुळे इंधन आणि वेळेची बचत होऊन प्रदूषणात लक्षणीय घट होण्याची अपेक्षा आहे.
या प्रकल्पासाठी ऑनलाइन निविदा प्रक्रियेत चार कंत्राटदारांनी सहभाग घेतला असून, एकूण खर्च दोन कोटी ८७ लाख ४३ हजार ३४६ रुपये (जीएसटीसह) इतका अपेक्षित आहे. काम पूर्ण करण्यासाठी १२ महिन्यांचा कालावधी देण्यात येणार असून, त्यानंतर पाच वर्षे देखभाल व दुरुस्तीची जबाबदारी कंत्राटदारावर असेल.
चौकट
पर्यावरण संरक्षणाला चालना
हायब्रिड स्मशान प्रणालीमुळे पारंपरिक पद्धती जपून आधुनिक तंत्रज्ञानाचा समन्वय साधला जाणार आहे. यामुळे लाकडाचा वापर मोठ्या प्रमाणात कमी होऊन कार्बन उत्सर्जनात घट होईल. तसेच धूर व दुर्गंधी कमी झाल्याने परिसरातील नागरिकांच्या आरोग्यावर होणारा परिणामही कमी होणार आहे. त्यामुळे हा प्रकल्प केवळ सुविधा सुधारणा नसून, पर्यावरण संरक्षणाच्या दृष्टीने महत्त्वाचे पाऊल ठरणार असल्याचे मानले जात आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.