महामार्ग प्रशासनाची मान्सूनपूर्व कामांना गती

महामार्ग प्रशासनाची मान्सूनपूर्व कामांना गती
Published on

महामार्ग प्रशासनाची माॅन्सूनपूर्व कामांना गती
नाले स्वच्छता, दुरुस्तीला प्राधान्य

कासा, ता. ६ (बातमीदार) : दरवर्षीप्रमाणे पावसाळ्यात उद्भवणाऱ्या समस्यांवर नियंत्रण मिळवण्यासाठी महामार्ग प्रशासनाने मॉन्सूनपूर्व तयारीला वेग दिला आहे. पावसाळ्यात महामार्गावर पाणी साचल्यामुळे होणारी वाहतूक कोंडी व अपघातांचे प्रमाण कमी करण्यासाठी विविध उपाययोजना राबवण्यात येत आहेत.

या पार्श्वभूमीवर तलासरी व विवळवेढे परिसरातील उड्डाणपुलांखालील पावसाच्या पाण्याचा निचरा करणाऱ्या नाल्यांची स्वच्छता व दुरुस्तीची कामे हाती घेण्यात आली आहेत. नाल्यांमध्ये साचलेली माती, कचरा व राडारोडा यामुळे पाण्याच्या प्रवाहास अडथळा येत असल्याने या ठिकाणी प्राधान्याने स्वच्छता मोहीम राबवली जात आहे. यंत्रसामग्री व मनुष्यबळाच्या सहाय्याने नाले साफ करून पावसाचे पाणी सुरळीत वाहून जाण्याची व्यवस्था करण्यात येत आहे.
सध्या ही मोहीम तलासरी व विवळवेढे येथे सुरू असली तरी महामार्गावरील इतर महत्त्वाच्या ठिकाणांवरही टप्प्याटप्प्याने कामे केली जाणार आहेत. प्रमुख उड्डाणपुलांखालील नाले व गटारे स्वच्छ करण्यास प्राधान्य देण्यात येत असून, कामांवर देखरेख ठेवण्यासाठी स्वतंत्र पथके नियुक्त करण्यात आली आहेत. ही पथके नियमित पाहणी करून कामात अडथळे येऊ नये याची दक्षता घेत आहेत.
-----------
आपत्कालीन स्थितीसाठी सज्ज

याशिवाय पावसाळ्यापूर्वी खराब झालेल्या रस्त्यांची दुरुस्ती, आवश्यक ठिकाणी डांबरीकरण, दिशादर्शक फलकांची दुरुस्ती व धोकादायक वळणांवर सूचना फलक बसविण्याची कामेही सुरू आहेत. आपत्कालीन परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी महामार्ग प्रशासनाने पोलिस व स्थानिक प्रशासनाशी समन्वय साधला आहे. मॉन्सून सुरू होण्यापूर्वी सर्व तांत्रिक व स्वच्छताविषयक कामे पूर्ण करून प्रवाशांचा प्रवास सुरक्षित व सुरळीत ठेवण्याचा प्रशासनाचा प्रयत्न असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com