

धुरामुळे भुयारी मेट्राे दाेन तास ठप्प
आंतरराष्ट्रीय विमानतळ स्थानकात धूर
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ६ : आरे-कफ परेड भुयारी मेट्रो मार्गिकेवरील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ (टी २) मेट्रो स्थानकातील तांत्रिक रूममधून धूर निघाल्याची घटना आज बुधवारी (ता. ६) दुपारी घडली. त्यामुळे प्रतिबंधात्मक उपाय म्हणून मुंबई मेट्राे रेल काॅर्पोरेशनने (एमएमआरसी) तत्काळ स्थानक रिकामे केले. त्यानंतर सहार मेट्रो स्थानक ते आरे ही मेट्रो सेवा सुमारे दोन तास बंद झाल्यामुळे प्रवाशांची मोठी गैरसोय झाली.
भुयारी मेट्रोचे संचलन सुरळीत सुरू असतानाच दुपारी स्थानकात तांत्रिक उपकरणे असलेल्या रूममधून धूर येत असल्याचे सुरक्षा रक्षकांच्या निदर्शनास आले आहे. त्यामुळे आपत्कालीन टीमने तत्काळ धाव घेऊन परिस्थिती नियंत्रणात आणली. प्रतिबंधात्मक उपाय म्हणून सहार मेट्रो स्थानक ते आरे मेट्रो स्थानकाची सेवा बंद केली होती. आवश्यक तपासण्या पूर्ण झाल्यानंतर सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास मेट्रो सेवा सुरळीत सुरू झाल्याचे एमएमआरसीने स्पष्ट केले आहे. याप्रकरणी एमएमआरसीकडून चौकशी केली जाणार आहे; मात्र दुपारनंतर मरोळ नाका, एमआयडीसी, सिप्झ, आरे जेव्हीएलआरच्या दिशेने जाणाऱ्या प्रवाशांना सहार मेट्रो स्थानकाच्या पुढे मेट्रो सेवा नसल्याने मनस्ताप सहन करावा लागला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.