उन्हाची काहिली कमी करतंच

उन्हाची काहिली कमी करतंच
Published on

भर उन्हात पोटासाठी खटपट
खाडी परिसरात मासेमारी करण्यासाठी गर्दी

विरार, ता. ७ (बातमीदार) ः कडक उन्हामुळे एकीकडे अंगाची लाहीलाही होत आहे तर दुसरीकडे भर उन्हात खाडी परिसरात पागाने मासेमारी करण्यासाठी झुंबड उडाली आहे.
भरतीच्या वेळी सुरू होणारी मासेमारी ओहोटीपर्यंत चालते. या प्रक्रियेत मिळणारे ताजे मासे घरच्या जेवणासाठी उपयोगी पडतात तर अतिरिक्त मासे विकून चांगले उत्पन्नही मिळते. एका भरती-ओहोटीच्या कालावधीत साधारण २०० ते ५०० रुपयांपर्यंत मासे विक्री होत असल्याचे मच्छीमार सांगतात. खरबी, कोळंबट, निवटी, बोय यांसारख्या माशांना बाजारात मागणी असल्याने खवय्ये ताज्या माशांवर तुटून पडतात. त्याचबरोबर गोड्या तलाव किंवा नदीतील माशांनाही चांगली मागणी असल्याने सुट्टीच्या काळात आनंदाबरोबरच पैसे कमावण्यासाठीची धडपड सुरू आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com