माजी नगराध्यक्ष संदीप वैद्य कालवश

माजी नगराध्यक्ष संदीप वैद्य कालवश
Published on

माजी नगराध्यक्ष संदीप वैद्य कालवश
जव्हार, ता. ७ (बातमीदार)ः जव्हार शहराचे माजी नगराध्यक्ष तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, मर्चंट पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष संदीप रवींद्र वैद्य यांचे वयाच्या ६१व्या वर्षी राहत्या घरी गुरुवारी हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर ठाणे येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. कर्तव्यदक्ष नेतृत्व, समाजासाठी समर्पित जीवन, अखंड जनसेवा ही वैद्य यांची ओळख होती. २०१७ मध्ये जव्हार नगर परिषद निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसकडून नगराध्यक्षपदाची धुरा सांभाळत त्यांनी शहर विकासासाठी विविध उपक्रम राबवले. रस्ते, गटारे, खडखड नळ पाणीपुरवठा योजना, जय सागर जलाशय उंची वाढविणे, स्वच्छता तसेच शहर सौंदर्यीकरणाच्या कामांना प्राधान्य दिले. सहकार क्षेत्रात त्यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिले होते. विविध सामाजिक, धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रमात त्यांचा सक्रिय सहभाग होता. सर्वसामान्य नागरिकांशी जिव्हाळ्याने वागणारे नेतृत्व म्हणून त्यांची ओळख होती. त्यांच्या निधनाने राजकीय, सामाजिक, सहकार क्षेत्रात हळहळ व्यक्त होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com