बहुजन आणि भाजप मध्ये थेट लढत

बहुजन आणि भाजप मध्ये थेट लढत
Published on

बविआ, भाजपमध्ये रस्सीखेच
महिला व बालकल्याण, आरोग्य समितीसाठी निवडणूक
विरार, ता. ७ (बातमीदार)ः वसई-विरार पालिकेच्या निवडणुकीनंतर तब्बल तीन महिन्यांनी समिती सभापतीसाठी शुक्रवारी (ता. ८) निवडणूक होत आहे. या निवडणुकीसाठी बविआविरोधात भाजप अशी थेट लढत होत असून, पीठासीन अधिकारी म्हणून जिल्हाधिकारी डॉ. इंदुराणी जाखड काम पाहणार आहेत.
आरोग्य समितीसाठी बहुजन विकास आघाडीकडून नीलेश देशमुख यांनी तर भाजपकडून डॉ. योगिता करंजकर यांनी अर्ज दाखल केले आहेत. उपसभापतिपदासाठी बविआचे निषाद चोरगे तर भाजपकडून जितेंद्र राऊळ यांनी अर्ज दाखल केले आहेत. महिला आणि बालकल्याण समिती सभापतिपदासाठी भाजपकडून सानवी यंदे तर बहुजन विकास आघाडीकडून बिना मायकल फुरट्याडो यांनी अर्ज दाखल केले आहेत. तर उपसभापतिपदासाठी भाजपकडून मीना निकम तर बहुजन विकास आघाडीच्या सुवर्णा पाटील निवडणुकीच्या रिंगणात आहेत. सर्व उमेदवारांनी पालिका सचिव विश्वनाथ तळेकर यांच्याकडे अर्ज सादर केले असून, दोन्ही समितींवर कोणाचे वर्चस्व राहणार याची उत्सुकता लागली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com