दादर रेल्‍वे स्थानकालगत कचरा;

दादर रेल्‍वे स्थानकालगत कचरा;
Published on

दादर रेल्‍वे स्थानकालगत कचरा; प्रवाशांना दुर्गंधीचा त्रास
धारावी, ता. ७ (बातमीदार) : रेल्वेच्या मध्य रेल्वेवरील वर्दळीचे स्थानक म्हणून ओळख असलेल्या दादर रेल्‍वे स्थानकावर रात्रंदिवस प्रवाशांची रेलचेल असते. स्थानकातील फलाट क्रमांक १२ वरून बाहेर पडण्यासाठी परळ दिशेला असलेल्या प्रवेशद्वाराजवळ कचऱ्याचे डबे ठेवण्यात आले आहेत. हे डबे कचऱ्याने ओसंडून वाहत आहेत. त्यामुळे त्या ठिकाणी दुर्गंधी निर्माण झाली आहे.
प्रवेशद्वारातून आत जाणारे व बाहेर येणाऱ्या प्रवाशांना नाकाला रुमाल लावून ये-जा करावी लागत आहे. त्‍यामुळे प्रवासी संताप व्यक्त करत आहेत. या प्रवेशद्वाराजवळ रेल्वे युनियन व दादर लोहमार्ग पोलिस ठाणे आहे. ही दुर्गंधी तिथे असलेल्या कर्मचाऱ्यांनासुद्धा सहन करावी लागत आहे. रेल्‍वेकडून तिकिटाचे पैसे घेतले जातात. मात्र, सुविधा पुरवल्‍या जात नाहीत. याकडे रेल्वे प्रशासनाने गांभीर्याने लक्ष दिले पाहिजे, अशी प्रतिक्रिया महिला प्रवासी सुषमा शिंदे यांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com