उत्तर-पश्चिम मुंबईच्या विकासाला वेग;

उत्तर-पश्चिम मुंबईच्या विकासाला वेग;
Published on

उत्तर-पश्चिम मुंबई लोकसभा मतदारसंघातील प्रश्‍नांवर चर्चा
जोगेश्‍वरी, ता. ७ (बातमीदार) ः उत्तर-पश्चिम मुंबई लोकसभा मतदारसंघातील अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या प्रश्नांना आता गती मिळण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. खासदार रवींद्र वायकर यांनी मंगळवारी (ता. ५) महापालिका आयुक्त अश्‍विनी भिडे यांची भेट घेऊन मतदारसंघातील विविध नागरी प्रश्नांवर सविस्तर चर्चा केली. बैठकीत २० हून अधिक विषयांवर सकारात्मक निर्णय झाले असून, सर्व कामांचा सातत्याने पाठपुरावा केला जाईल, असे खासदार रवींद्र वायकर यांनी सांगितले.
या बैठकीत जोगेश्वरी, अंधेरी, गोरेगाव आणि दिंडोशी परिसरातील नागरिकांच्या दैनंदिन समस्यांबाबत महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले. बैठकीत अनधिकृत बांधकामांविरोधात कठोर कारवाईचे संकेत देण्यात आले. रॉयल पाम परिसरातील अनधिकृत बंगले तसेच आरे कॉलनीतील बेकायदेशीर स्टुडिओंवर लवकरच कारवाई करण्यात येणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले. हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे ट्रॉमा रुग्णालयातील रिक्त पदे तातडीने भरण्यात येणार असून, महिनाभरात रुग्णालयातील सुविधा सुधारण्यात येणार आहेत. याशिवाय, ट्रॉमा रुग्णालयाशेजारीच मिनी फायर स्टेशन उभारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com