

गोवंडी पादचारी पुलावरील दिवे बंद; प्रवासी त्रस्त
चेंबूर, ता. ७ (बातमीदार) ः गोवंडी रेल्वे स्थानक परिसरातील पादचारी पुलावरील दिवे गेल्या काही दिवसांपासून बंद असल्याने प्रवाशांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. सायंकाळनंतर आणि पहाटेच्या वेळेत पुलावर अंधाराचे साम्राज्य पसरत असून, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
हार्बर मार्गावरील गोवंडी रेल्वे स्थानक महत्त्वाचे स्थानक समजले जाते. या स्थानकात दिवसेंदिवस गर्दी वाढताना दिसत आहे. या स्थानकातील चेंबूर रेल्वे स्थानकाच्या दिशेला असलेल्या पादचारी पुलावरून दररोज हजारो प्रवासी वापर करतात. मात्र, पुलावरील दिवे बंद असल्यामुळे विशेषत महिला, गरोदर महिला, ज्येष्ठ नागरिक आणि विद्यार्थ्यांना अंधारातून मार्ग काढावा लागत आहे. काही ठिकाणी पूर्णपणे अंधार असल्याने अपघात होण्याची शक्यताही व्यक्त केली जात आहे.
पुलावर पुरेशी प्रकाश व्यवस्था नसल्यामुळे रात्रीच्या वेळी असुरक्षित वाटते. चोरी किंवा अन्य अनुचित प्रकार घडण्याची भीती कायम आसल्याची खंत प्रवाशांनी व्यक्त केली आहे.
याबाबत रेल्वे प्रशासनाकडे अनेकदा तक्रार करण्यात आली आहे. मात्र, अद्याप कोणतीही ठोस कार्यवाही करण्यात आलेली नाही. बंद पडलेले दिवे तत्काळ दुरुस्त करून पुलावर पुरेशी प्रकाश व्यवस्था करण्यात यावी, अशी मागणी प्रवाशांकडून होत आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.