बंगालमधील महायुतीच्या यशाबद्दल आमदार दिलीप लांडे यांची महाआरती

बंगालमधील महायुतीच्या यशाबद्दल आमदार दिलीप लांडे यांची महाआरती
Published on

बंगालमधील महायुतीच्या यशाबद्दल आमदार दिलीप लांडे यांची महाआरती

घाटकोपर, ता. ७ (बातमीदार) ः पश्चिम बंगालच्या विधानसभा निवडणुकीत भाजप महायुतीला मिळालेल्या यशाबद्दल आमदार दिलीप लांडे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना चांदिवली विधानसभेतर्फे महाआरतीचे आयोजन करण्यात आले होते. सत्ता स्थापन करण्यासाठी पश्चिम बंगालमध्ये भाजपकडे एकहाती बहुमत आहे. पश्चिम बंगालच्या या यशाबद्दल आमदार दिलीप लांडे यांच्या मार्गदर्शनाखाली कुर्ला काजूपाडा येथील श्री गणेश मंदिरात महाआरतीचे आयोजन करण्यात आले होते. महाआरतीनंतर लांडे मामा यांनी प्रसाद वाटून आनंद साजरा केला. या वेळी शिवसेना शाखाप्रमुख सुशील जाधव, शैलेश निंबाळकर, प्रदीप बंड आदी स्थानिक रहिवासी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com