

शूटिंग बॉलचा रविवारपासून थरार
माहीममधील राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेची उत्सुकता
पालघर, ता. ७ (बातमीदार)ः माहीमच्या यंग स्टार फाउंडेशनतर्फे भुवनेश कीर्तने विद्यालयाच्या क्रीडांगणावर अखिल भारतीय शूटिंग बॉल स्पर्धा होणार आहे. या स्पर्धेमध्ये सहा राज्यांतील विविध संघ सहभागी होणार असल्याने रविवारपासून स्पर्धेचा थरार क्रीडाप्रेमींना लुटता येणार आहे.
पालघर जिल्हा शूटिंग बॉल असोसिएशन व अमुचर शूटिंग बॉल स्पोर्ट्स असोसिएशन महाराष्ट्र यांच्या मान्यतेने रविवार (ता. १०) ऑल इंडिया शूटिंग बॉल स्पर्धा होत आहे. माहीमच्या कीर्तने विद्यालयाच्या क्रीडांगणावर संध्याकाळी ५पासून स्पर्धा सुरू होणार आहे. यामध्ये जामनेर, इस्तियाक, टेंभुर्णी, मनेराजुरी, अमीरकाजी, सोलापूर, इकरार उत्तराखंड, एमपी, अरमान पंजाब, राजस्थान कोटा, पालघर ब्लू, पालघर रेड, बृहन्मुंबई पालिका, बीपीटी, पालघर जिल्हा पोलिस दलाचे संघ सहभागी होणार आहे. या स्पर्धेचा आनंद लुटण्यासाठी क्रीडाप्रेमींनी उपस्थित राहावे, असे आवाहन यंग स्टार फाउंडेशनने केले आहे.
------------------------
बक्षिसांची लयलूट
या स्पर्धेत विजेत्या संघाला १५ हजार रुपये व चषक देऊन गौरविण्यात येणार आहे. उपविजेत्या संघास पारितोषिक १०,००० व चषक, तृतीय, चतुर्थ पारितोषिक ७,००० चषक, पाचव्या ते आठव्या क्रमांकाला चार हजार रुपये व चषक देऊन गौरविण्यात येणार आहे.
---------------------------
मान्यवरांची हजेरी
स्पर्धेचे उद्घाटक सागर पाटील असून, विशेष अतिथी म्हणून जिल्हा क्रीडा अधिकारी सुहास वनमाने, राष्ट्रीय खेळाडू, क्रीडा अधिकारी नवी मुंबई पालिका रेवप्पा गुरव, माहीम सरपंच प्रीती पाटील, निखिल राऊत, चेतन म्हात्रे उपस्थित राहणार आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.