महामार्गाच्या दुबार खर्चाची चौकशीची मागणी

महामार्गाच्या दुबार खर्चाची चौकशीची मागणी
Published on

महामार्गाच्या दुबार खर्चाची चौकशीची मागणी
स्थायी समिती सदस्य तेजिंदर सिंग तिवाना यांचा आढावा

मालाड, ता. ७ (बातमीदार) : मुंबई महापालिकेच्या स्थायी समितीच्या बैठकीत मालाडमधील प्रभाग क्रमांक ४७ चे नगरसेवक तजिंदर सिंग तिवाना यांनी पूर्व द्रुतगती महामार्गावर करण्यात आलेल्या कोट्यवधी रुपयांच्या खर्चाबाबत गंभीर प्रश्न उपस्थित करत सखोल चौकशीची मागणी केली आहे.

तिवाना यांनी सांगितले की, नोव्हेंबर २०२२ पासून महापालिकेच्या ताब्यात आलेल्या या महामार्गावर खड्डेमुक्ती आणि दुरुस्तीच्या नावाखाली प्रचंड खर्च करण्यात आला आहे. २०२३ मध्ये पावसाळ्यापूर्वीच्या डागडुजीसाठी सुमारे ९३ कोटी खर्च करण्यात आले, जे नंतर वाढून १०९ कोटी झाल्याचे त्यांनी सांगितले. एवढा प्रचंड खर्च करूनही जर पुन्हा ६३ कोटींचे मायक्रो सरफेसिंगचे काम देण्यात येत असेल, तर यापूर्वी केलेल्या कामांची गुणवत्ता आणि उपयोगिता काय होती, असा प्रश्न तिवाना यांनी उपस्थित केला. तसेच, आधीच्या कामांवर अजूनही हमी कालावधी लागू असताना नव्याने काम देणे म्हणजे जुन्या कामांच्या हमी कालावधीला बगल देण्याचा प्रयत्न आहे का?, असेही त्यांनी विचारले.

मागील वर्षी मायक्रो सरफेसिंगसाठी खर्च करण्यात आलेल्या सुमारे ४३ कोटींच्या कामाची सद्यःस्थिती काय आहे, याचीही माहिती देण्याची त्यांनी मागणी केली. तिवाना यांनी सांगितले की, २०२३ पासून खड्डे दुरुस्तीवर झालेल्या सर्व खर्चाची आणि संबंधित कंत्राटदारांची सखोल चौकशी करण्यात यावी. त्या काळात प्रशासकीय स्तरावर मनमानी पद्धतीने निर्णय घेतले गेले असल्याची शक्यता नाकारता येत नाही. तसेच यामध्ये काही भ्रष्टाचार झाला आहे का? याचीदेखील चौकशी करावी, अशी मागणी केली आहे. त्यामुळे या सर्व कामांची गुणवत्ता, खर्च आणि जबाबदारी निश्चित करण्यासाठी स्वतंत्र चौकशी करणे अत्यावश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com