

टोकावडे, ता. ७ (बातमीदार) : ग्रामीण भागातील युवकांना स्पर्धा परीक्षांसाठी सक्षम व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी मुरबाड येथे स्पर्धा परीक्षा भवन उभारण्यात येणार असल्याची घोषणा राज्याचे सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट यांनी केली. म्हसा विभागातील ४० गावांच्या वतीने आयोजित भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सव कार्यक्रमात ते बोलत होते.
या वेळी बोलताना मंत्री शिरसाट यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांमुळे समाजातील सर्वसामान्य घटकांना शिक्षण, नोकरी आणि प्रगतीच्या संधी उपलब्ध झाल्याचे सांगितले. ‘रिक्षाचालक ते मंत्री’ असा स्वतःचा संघर्षमय प्रवास मांडताना हा प्रवास भारतीय संविधानामुळेच शक्य झाल्याचे त्यांनी नमूद केले. सामाजिक न्याय विभागामार्फत राज्यभरात विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह उभारणीचे काम सुरू असल्याची माहिती देताना त्यांनी सांगितले, १२० नवीन वसतिगृहांमधून २० हजार विद्यार्थ्यांना सुविधा उपलब्ध होणार आहेत. तसेच मुरबाडमधील स्पर्धा परीक्षा भवनासाठी आवश्यक आर्थिक मदत देण्याची घोषणाही त्यांनी यावेळी केली. या कार्यक्रमाला तहसीलदार अभिजित देशमुख, समाज कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त समाधान इंगळे, वरिष्ठ पोलिस निरीक्षक सचिन हुंदळेकर, प्रवीण राऊत, माजी जिल्हा परिषद सदस्य उल्हास बांगर, जयंती महोत्सव समितीचे अध्यक्ष प्रकाश जाधव, दिनेश उघडे, अण्णा साळवे, दयानंद रातांबे आदी मान्यवर उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.