पाचपाखाडीत इमारतीच्या मीटर रूमला आग

पाचपाखाडीत इमारतीच्या मीटर रूमला आग
Published on

सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. ७ : पाचपाखाडी परिसरातील उत्सव हॉटेलजवळ असलेल्या सारिका अपार्टमेंटच्या तळमजल्यावरील मीटर रूममध्ये गुरुवारी पहाटे आग लागल्याची घटना घडली. अग्निशमन दलाच्या तत्परतेमुळे आग वेळेत आटोक्यात आणण्यात यश आले. या घटनेत कोणतीही जीवितहानी अथवा दुखापत झाली नसली तरी १२ मीटर बॉक्स जळून गेले आहेत.
ठाणे महापालिका आपत्ती व्यवस्थापन कक्षाला पहाटे १.१२ वाजण्याच्या सुमारास घटनेची माहिती मिळाली. पाचपाखाडी अग्निशमन केंद्राचे जवान एक बंबासह तातडीने घटनास्थळी दाखल झाले. यावेळी आपत्ती व्यवस्थापन विभागाचे कर्मचारी, महावितरणचे अधिकारी व कर्मचारी आणि नौपाडा पोलिस ठाण्याचे अधिकारी, कर्मचारीही घटनास्थळी उपस्थित होते. सारिका अपार्टमेंट ही तळ अधिक तीन मजली इमारत असून तळमजल्यातील मीटर रूममध्ये आग लागली होती. आगीमुळे १२ वीज मीटर जळून गेले. अग्निशमन दलाने शर्थीचे प्रयत्न करत पहाटे १.३५ वाजेपर्यंत आग पूर्णपणे नियंत्रणात आणली. या घटनेबाबत ठाणे महापालिका आपत्ती व्यवस्थापन विभागाचे अधिकारी यासिन तडवी यांनी माहिती दिली. आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून पुढील तपास सुरू आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com