

सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. ७ : कळवा आणि दिवा परिसरात झालेल्या दोन वेगवेगळ्या घरफोड्यांच्या घटनांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. चोरट्यांनी दोन्ही ठिकाणी घरातून सोन्याचे दागिने आणि मोबाईल असा तब्बल सात लाखांहून अधिक किमतीचा ऐवज लंपास केल्याची माहिती पोलिसांनी दिली.
कळवा येथील शिवशक्तीनगर परिसरात राहणारे रिक्षाचालक तुकाराम उत्तेकर यांच्या घरात पहाटेच्या सुमारास घरफोडी झाली. चोरट्यांनी घरातील सदस्यांना बाहेरून कडी लावून बंदस्त केले. त्यानंतर कपाटातील तिजोरी फोडून सोन्याचे मंगळसूत्र, कर्णफुले, अंगठी; तसेच दोन मोबाईल चोरीला नेले. या चोरीतील मुद्देमालाची किंमत दोन लाख ६८ हजार रुपये असल्याचे कळवा पोलिस ठाण्यात दाखल केलेल्या तक्रारीत नमूद आहे. दुसरी घटना दिवा पूर्वेतील सद्गुरूनगर परिसरात घडली. येथे चोरट्यांनी घराचे कुलूप तोडून कपाटातील सोन्याचे मंगळसूत्र, कानपट्ट्या, मणी आणि नथ असा चार लाख ४५ हजार ५०० रुपयांचा ऐवज लंपास केला. याप्रकरणी विपुल जाधव यांनी मुंब्रा पोलिस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला. दोन्ही घरफोडी प्रकरणांचा तपास संबंधित पोलिस ठाण्यांकडून सुरू असून, परिसरातील सीसीटीव्ही फुटेज आणि अन्य तांत्रिक बाबींची पडताळणी करण्यात येत असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.