

सकाळ वृत्तसेवा
डोंबिवली, ता. ७ : पश्चिमेतील नागरिकांसाठी अत्यंत महत्त्वाची सुविधा अखेर उपलब्ध झाली असून, परिसरात कायमस्वरूपी आधार सेवा केंद्र सुरू करण्यात आले आहे. त्यामुळे आधारकार्डसंबंधित विविध कामांसाठी नागरिकांना आता डोंबिवली पूर्वेला जाण्याची गरज भासणार नाही. अनेक वर्षांपासून पश्चिमेकडील नागरिकांकडून केंद्राची मागणी केली जात होती.
डोंबिवली पश्चिमेतील पंडित दीनदयाळ मार्ग, आनंदनगर येथील नागरी आरोग्य केंद्राच्या वरच्या मजल्यावर हे केंद्र गुरुवारी सुरू करण्यात आले. या केंद्रामध्ये आधार नोंदणी, बायोमेट्रिक अपडेट, मोबाईल क्रमांक लिंक करणे, दुरुस्ती, पॅनकार्ड; तसेच गॅझेटसंबंधित कामे करण्यात येणार आहेत. केंद्राचे उद्घाटन नगरसेविका ज्योती पाटील, हर्षदा भोईर आणि रसिका पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी भाजप जुनी डोंबिवली पश्चिम मंडल अध्यक्ष पवन पाटील, कैलास डोंगरे यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. या केंद्रामुळे हजारो नागरिकांची वेळ आणि प्रवासाचा खर्च वाचणार असून आधारसंबंधित कामे अधिक सुलभ होणार आहेत. उद्घाटनप्रसंगी नागरिकांनी या सुविधेचे स्वागत करत जास्तीत जास्त लोकांनी केंद्राचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले.
त्रासातून मुक्ती
यापूर्वी डोंबिवली पश्चिमेतील नागरिकांना आधारकार्डाशी संबंधित कामांसाठी पूर्वेकडील केंद्रांवर जावे लागत होते. त्यामुळे ज्येष्ठ नागरिक, महिला तसेच कामगार वर्गाला मोठा मनस्ताप सहन करावा लागत होता. अनेकदा लांबच लांब रांगा आणि प्रवासाचा त्रास सहन करावा लागत असल्याने नागरिकांकडून नाराजी व्यक्त केली जात होती. नागरिकांची ही गैरसोय लक्षात घेऊन आता पश्चिमेतच कायमस्वरूपी सेवा केंद्र सुरू केल्याने परिसरातील नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.