मुरुड–धुळे एसटीचे आरक्षण बंद

मुरुड–धुळे एसटीचे आरक्षण बंद
Published on

मुरूड-धुळे एसटीचे आरक्षण बंद
ऐन हंगामात सुविधा बंद केल्याने गैरसोय; सेवा पूर्ववत करण्याची मागणी

मुरूड, ता. ७ (वार्ताहर) ः मुरूड आगारातून धुळे, शिर्डी, लातूर, गहिनीनाथनगर, तुळजापूर आदी ठिकाणी धावणाऱ्या लांब पल्ल्याच्या एसटी बससेवांमध्ये धुळे मार्गावरील ‘लालपरी’ सर्वाधिक उत्पन्न देणारी सेवा मानली जाते. सीझनमध्ये ४० ते ४१ हजार रुपये उत्पन्न मिळवणारी ही बस २०१२ पासून सुरू असून जेएसडब्ल्यू कर्मचारी, शासकीय व निमशासकीय कर्मचारी तसेच नाशिक, धुळे, मालेगाव, सटाणा, नंदुरबार येथील प्रवाशांसाठी अत्यंत सोयीची ठरली आहे; मात्र ४ मे २०२६ पासून या बसची आरक्षण सुविधा अचानक बंद करण्यात आल्याने प्रवाशांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. आगाराकडून कधी आरक्षण सुरू, तर कधी बंद करण्याच्या प्रकारामुळे प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.
ज्येष्ठ नागरिक बळीराम जाधव यांनी आरक्षण बंद करण्याबाबत कोणतीही स्पष्ट माहिती मिळत नसल्याची तक्रार केली. तर प्रीती सैंदाणे यांनी अनेकदा आगारात जाऊनही आरक्षण न मिळाल्याची खंत व्यक्त केली. इस्माईल शेख यांना मालेगाव-भिवंडी प्रवास उभ्याने करावा लागल्याचे त्यांनी सांगितले.
पर्यटनस्थळ असलेल्या मुरूडहून लांब पल्ल्याचा प्रवास सुलभ व्हावा, यासाठी विभागीय नियंत्रकांनी तातडीने लक्ष घालून आरक्षण सेवा पूर्ववत करावी, अशी मागणी प्रवाशांकडून होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com