

महा सीईटीचे तंत्रज्ञानकेंद्री रूपांतर
यावर्षी १८.१२ लाख परीक्षार्थी
मुंबई, ता. ७ : महा सीईटी विभागाच्या तंत्रज्ञानकेंद्री रूपांतरणामुळे प्रवेश परीक्षांच्या सहभागात विक्रमी वाढ झाली असून, २०२६ मध्ये तब्बल १८.१२ लाख विद्यार्थी या परीक्षेला बसणार आहेत. २०२५ मधील १४.०८ लाख विद्यार्थ्यांच्या तुलनेत ही वाढ २८ टक्क्यांहून अधिक आहे.
संगणकावर आधारित चाचण्यांचा विस्तार, सीईटी-अटल असेसमेंट टेस्ट, डिजिटल सहाय्य केंद्रे आणि भौगोलिक माहिती प्रणालीद्वारे पायाभूत सुविधांचे मॅपिंग यांसारख्या तंत्रज्ञानाच्या प्रभावी वापरामुळे ग्रामीण आणि शहरी भागातील दरी कमी करण्यात विभागाला मोठे यश आले आहे. राज्याच्या ग्रामीण भागात स्मार्टफोनची उपलब्धता आता ८४ टक्क्यांवर पोहोचली असून, याचा थेट फायदा तळागाळातील विद्यार्थ्यांना सामावून घेण्यात होत आहे.
प्रगतिशील धोरणे, नियामक सहाय्य आणि सातत्यपूर्ण नवकल्पना यांच्या माध्यमातून राज्य सीईटी विभाग मजबूत करण्यासाठी महाराष्ट्र सरकार वचनबद्ध आहे. जसा सहभाग वाढत जाईल आणि तंत्रज्ञान शैक्षणिक क्षेत्राला नवीन आकार मिळेल, तशी आम्ही सक्षमीकरणास अनुकूल धोरणे आखू व आवश्यक त्या सुधारणा घडवून आणू. ही धोरणे व सुधारणा यांच्या माध्यमातून प्रत्येक पात्र विद्यार्थ्याला पारदर्शक, आवाक्यातील व भविष्यकाळासाठी सज्ज अशा प्रवेश परिसंस्थेचा लाभ घेता येईल, असे राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले.
----------------
व्यावसायिक शिक्षणाचा मार्ग सुकर
ॲनालिटिक्स, ॲडाप्टिव टेस्टिंग आणि एआय-एनेबल्ड मूल्यांकन साधनांचा लाभ घेण्याचे उद्दिष्ट आमच्यापुढे आहे. जेणेकरून प्रत्येक महत्त्वाकांक्षी विद्यार्थी, मग तो कोणत्याही भौगोलिक प्रदेशात राहत असो, त्याला स्पर्धेत उतरण्याची व यशस्वी होण्याची समान संधी प्राप्त होऊ शकेल, असे राज्याच्या सीईटी विभागाचे आयुक्त दिलिप सरदेसाई म्हणाले. या डिजिटल वाटचालीमुळे भविष्यात भौगोलिक अडथळे दूर होऊन व्यावसायिक शिक्षणाचा मार्ग सर्वांसाठी अधिक सुकर होईल.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.