अग्निशमन केंद्र उभारण्यासाठी महापालिकेची फेरनिविदा

अग्निशमन केंद्र उभारण्यासाठी महापालिकेची फेरनिविदा
Published on

अग्निशमन केंद्र उभारण्यासाठी महापालिकेची फेरनिविदा
कामोठे, ता. ७ ( बातमीदार ) : कामोठे येथे अग्निशमन केंद्र उभारण्यासाठी पनवेल महापालिकेने निविदा प्रक्रिया रद्द केली होती. नगरसेवक डॉ. अरुणकुमार भगत यांनी महासभेत प्रशासनाला जाब विचारला होता. कामोठेवासीयांनी समाजमाध्यमावर महापालिकेच्या धोरणावर टीकेची झोड उठवली होती. या घटनेनंतर अखेर महापालिकेने अग्निशमन केंद्र उभारण्यासाठी फेरनिविदा मागवली आहे.
कामोठे शहराची लोकसंख्या तीन लाखांच्या पुढे गेली आहे. शहरात आगीच्या घटनेत वाढ होत आहे. आग विझवणारी यंत्रणा उपलब्ध नसल्याने नागरिकांच्या मालमत्तेचे नुकसान होत आहे. जीविताला धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे कामोठे शहरात अग्निशमन केंद्र असणे गरजेचे झाले आहे. महापालिकेने कामोठे सेक्टर ३२ भूखंड क्रमांक ५ मध्ये ६९०५.३२ चौरस मीटर जागेत अग्निशमन केंद्राचे बांधकाम करण्यासाठी निविदा मागवली होती. मात्र, ही निविदा तांत्रिक बाबीमुळे रद्द झाल्याने नागरिकांनी रोष व्यक्त केला होता.
नगरसेवक डॉ. अरुणकुमार भगत यांनी महासभेत निविदा रद्द का झाली, तसेच अग्निशमन केंद्राचे बांधकाम सुरू होऊन कधी पूर्ण होणार, अशी विचारणा केली होती. यानंतर महापालिकेने अग्निशमन केंद्राचे बांधकाम करण्यासाठी नुकतीच फेरनिविदा प्रसिद्ध केली आहे. केंद्राच्या बांधकामासाठी सुमारे २५ कोटी रुपयांची तरतूद केली आहे.


सिडकोने कामोठे शहरात अग्निशमन केंद्र बांधणे आवश्यक होते. मात्र, सिडकोच्या नियोजनशून्य कारभारामुळे कामोठे शहरात अग्निशमन केंद्र उभे राहिले नाही. याचा फटका नागरिकांना सहन करावा लागत आहे. पनवेल महापालिकेने तत्परतेने अग्निशमन केंद्राचे बांधकाम सुरू करून ते वेळेवर पूर्ण करावे. नागरिकांना आधीच्या धोक्यापासून सुरक्षित ठेवावे.
- डॉ. अरुणकुमार भगत, नगरसेवक कामोठे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com