वरिष्ठ महाविद्यालयातील शिक्षकांना आता ‘यूजी ४.०चे प्रशिक्षण

वरिष्ठ महाविद्यालयातील शिक्षकांना आता ‘यूजी ४.०चे प्रशिक्षण
Published on

वरिष्ठ महाविद्यालयातील शिक्षकांना आता ‘यूजी ४.०’चे प्रशिक्षण

मुंबई, ता. ७ :  विद्यार्थ्यांना दर्जेदार व गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यासाठी अध्यापकांना बदलत्या शैक्षणिक प्रणालीशी सुसंगत कौशल्ये आणि शैक्षणिक प्रशिक्षणासाठी ‘यूजी ४.०’ हा प्रशिक्षण कार्यक्रम राबविला जाणार आहे. यासाठीची माहिती उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली.
तसेच ‘यूजी ४.०’ या उपक्रमाच्या यशस्वी अंमलबजावणीनंतर पुढील टप्प्यात अधिक प्रगत अध्यापक प्रशिक्षण कार्यक्रम राबविण्याची योजना असल्याची माहिती त्यांनी दिली. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२०अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या चार वर्षांच्या पदवी अभ्यासक्रमाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी अध्यापकांना सक्षम करण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र राज्य अध्यापक विकास संस्थेतर्फे (एमएसएफडीए) विकसित करण्यात आलेल्या ‘यूजी ४.०’ या सर्वसमावेशक ऑनलाइन अध्यापक प्रशिक्षण कार्यक्रमाचे उद्‍घाटन उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी मंत्री पाटील म्हणाले, की राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२०नुसार चार वर्षांच्या पदवी अभ्यासक्रमाची प्रभावी अंमलबजावणी करण्यात येत आहे. त्यामुळे अध्यापकांची भूमिका अधिक जबाबदारीची ठरणार असून, त्यांना सक्षम करण्यासाठी एमएसएफडीएने हा प्रशिक्षण कार्यक्रम विकसित केला आहे.
हा कार्यक्रम एमएसएफडीएच्या लर्निंग मॅनेजमेंट सिस्टीम (एलएमएस)द्वारे पूर्णपणे ऑनलाइन स्वरूपात राबविण्यात येणार असून, राज्यातील शहरी, निमशहरी आणि ग्रामीण भागातील सर्व अध्यापकांना तो सहज उपलब्ध होणार आहे.
...
नऊ मॉड्यूल्स
प्रशिक्षणामध्ये एकूण नऊ सविस्तर मॉड्यूल्सचा समावेश असून, प्रत्येक मॉड्युलद्वारे शिक्षकांच्या कौशल्यवृद्धीवर टप्प्याटप्प्याने भर देण्यात येणार आहे. प्रत्येक मॉड्यूलचा कालावधी सुमारे ३० ते ६० मिनिटांचा ठेवण्यात आला असून, शिक्षकांना स्व-अभ्यासाच्या लवचिकतेसह प्रशिक्षण पूर्ण करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. संस्थात्मक तयारी, विद्यार्थी समुपदेशन आणि शैक्षणिक प्रशासन यांसारख्या महत्त्वाच्या घटकांवरही या कार्यक्रमामध्ये मार्गदर्शन करण्यात येणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com