

विद्यार्थ्यांच्या फसवणुकीला लगाम
फौजदारी गुन्हे दाखल करण्याचे निर्देश
मुंबई, ता. ७ : उच्च व तंत्रशिक्षण घेणाऱ्या राज्यातील कोणत्याही विद्यार्थ्यांची खासगी, अनुदानित, विनाअनुदानित विद्यापीठे आदींकडून मनमानी शुल्कवसुली आणि मान्यता नसताना अभ्यासक्रम चालवून त्यातून केल्या जाणाऱ्या विद्यार्थ्यांच्या फसवणुकीची उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी गंभीर दखल घेतली आहे.
राज्यातील प्रत्येक विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक हिताचे संरक्षण करणे, ही सर्वोच्च प्राथमिकता असून त्यांची फसवणूक आणि त्यांचे शैक्षणिक नुकसान मुळीच खपवून घेतले जाणार नाही. यामुळे कोणत्याही संस्थांकडून विद्यार्थ्यांची फसवणूक करणाऱ्या संस्थांवर थेट फौजदारी गुन्हे दाखल करा, असे निर्देश त्यांनी प्रशासनाला दिले आहेत. मागील काही महिन्यापूर्वीच वांद्रे येथील डॉ. बळीराम हिरे महाविद्यालयातील विद्यार्थ्यांच्या फसवणूक प्रकरण समोर आले होते, त्याचीही दखल घेत यातील दोषी संस्थांवर तातडीने फौजदारी गुन्हे दाखल करण्याचे निर्देशही मंत्री पाटील यांनी दिले. तसेच महाराष्ट्र राज्य कृषी, पशू व मत्स्य विज्ञान, आरोग्य विज्ञान, उच्च, तंत्र व व्यवसाय शिक्षण यांमधील अनधिकृत संस्था व अनधिकृत अभ्यास पाठ्यक्रम (प्रतिबंध) अधिनियम २०१३मधील तरतुदीनुसार कारवाई करण्याचेही त्यांनी निर्देश दिले.
...
अनधिकृत संस्थांचीही दखल
राज्यात विविध ठिकाणी सुरू असलेल्या आणि सक्षम प्राधिकरणांची मान्यता नसलेल्या विद्यापीठ अथवा अनधिकृत संस्थांचीही मंत्री यांनी गंभीर दखल घेतली. या संस्थांमध्ये खूप मोठ्या प्रमाणावर प्रवेशोच्छुक विद्यार्थ्यांना खोटी प्रलोभने दाखवून अथवा संस्था मान्यताप्राप्त आहे, असे भासवून प्रवेश घेण्यास प्रवृत्त केले जाते; मात्र नंतर विद्यार्थ्यांना त्यांची फसवणूक झाल्याचे निदर्शनास येते. अशा अभ्यासक्रम, संस्थांची मान्यता तपासून घेण्याचे आवाहनही त्यांनी केले.
...
१३२हून अधिक विद्यार्थी पीडित
वांद्रे येथील डॉ. बळीराम हिरे महाविद्यालयात १३२हून अधिक विद्यार्थ्यांना बोगस अभ्यासक्रम आणि पदव्या देऊन फसविल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणाचा सविस्तर आढावा मंत्री पाटील यांनी घेतला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.