

पनवेलमध्ये सावत्र पित्याकडून मुलीवर अत्याचार
पनवेल, ता. ७ (वार्ताहर) : पनवेलमध्ये राहणाऱ्या एका ३४ वर्षीय व्यक्तीने १५ वर्षीय सावत्र मुलीवर दोन वर्षे लैंगिक अत्याचार केल्याची संतापजनक घटना उघडकीस आली आहे. पनवेल शहर पोलिसांनी या प्रकरणातील आरोपी सावत्र पित्याविरोधात बलात्कारासह पोक्सोअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणातील आरोपी सावत्र पिता सध्या दुसऱ्या एका गुन्ह्यात कारागृहात असून, त्याला अटक करण्याची तयारी पोलिसांनी सुरू केली आहे.
पीडित मुलगी आई व सावत्र पित्यासोबत पनवेलमध्ये राहण्यास आहे. पीडित मुलगी घरामध्ये एकटीच असताना आरोपी सावत्र पित्याने ऑगस्ट २०२४ मध्ये मुलीवर जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवून तिच्यावर अत्याचार केले. या प्रकाराबाबत कुणाला सांगितल्यास तिला मारण्याची धमकी दिली. त्यामुळे पीडित मुलीने कुणालाही या प्रकाराची माहिती दिली नाही. गेली दोन वर्षे या नराधमाने आपल्या सावत्र मुलीवर लैंगिक अत्याचार केले. दरम्यान, मागील महिन्यामध्ये आरोपी सावत्र पित्याने तो राहत असलेल्या इमारतीत शेजाऱ्यांसोबत हाणामारी केली होती. या गुन्ह्यात पनवेल शहर पोलिसांनी त्याला अटक केली होती. सध्या हा आरोपी तळोजा कारागृहामध्ये न्यायालयीन कोठीत आहे. याच दरम्यान, पीडित मुलीने सावत्र पित्याने तिच्यावर केलेल्या लैंगिक अत्याचाराची माहिती आपल्या आईला दिली. त्यानंतर पीडितेच्या आईने पनवेल शहर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानुसार पोलिसांनी नराधम सावत्र पित्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.