वाडिया रुग्णालयाने साजरा केला रिद्धी-सिद्धीचा १४ वा वाढदिवस

वाडिया रुग्णालयाने साजरा केला रिद्धी-सिद्धीचा १४ वा वाढदिवस
Published on

वाडिया रुग्णालयाने साजरा केला रिद्धी-सिद्धीचा १४ वा वाढदिवस
सकाळ वृत्तसेवा

मुंबई, ता. ७ : परेलच्या वाडिया रुग्णालयात सयामी जुळ्या असलेल्या रिद्धी-सिद्धी यांचा चौदावा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. रिद्धी-सिद्धी यांच्या वाढदिवसानिमित्त रुग्णालयातील डॉक्टर्स, परिचारिका आणि अन्य कर्मचाऱ्यांनी भेटवस्तू व शुभाशीर्वाद दिले.

जेव्हा या दोन जुळ्या बहिणींना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, तेव्हा त्यांचे गर्भाशय, मूत्राशय एकच होते. त्याचे डॉक्टरांनी यशस्वीरीत्या विभाजन केले. आम्ही गेली १४ वर्षे या मुलींची सर्वांगीण काळजी घेत आहोत, असे वाडिया रुग्णालयाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मिनी बोधनवाला यांनी सांगितले. शस्त्रक्रियेनंतरही या मुलींची वाढ परिपूर्ण व्हावी यासाठी आम्ही प्रत्येक गोष्टीकडे लक्ष देत आहोत. दोघींचीही शैक्षणिक प्रगती उत्तम असून, विविध उपक्रमांमध्ये त्या सक्रियपणे सहभाग घेतात, असे डॉ. बोधनवाला यांनी स्पष्ट केले.

या जुळ्या मुलींचे संगोपन, सर्व वैद्यकीय खर्च, शालेय शिक्षण, पोषण आणि इतर गरजा रुग्णालयाकडूनच पूर्ण केल्या जातात. या दोघीही मुली हसतमुखाने सर्व अडचणींचा सामना करत आहेत. या मुली त्यांची दैनंदिन कामे स्वतःच करत आहेत. वाढदिवसानिमित्त त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. आकलनक्षमता विकसित करणे, परिस्थितीशी जुळवून घेणे या दृष्टीने दोघींकडून नियमितपणे सराव करून घेतला जात आहे. या दोघीही वाडिया रुग्णालयात लहानाच्या मोठ्या झाल्या असून, रुग्णालयातील सर्व डॉक्टर्स, नर्स आणि कर्मचाऱ्यांना त्यांचा लळा लागला आहे. त्यामुळे सर्वांनी मिळून मोठ्या उत्साहात या दोघींचा वाढदिवस साजरा केला.

--------
रंगीबेरंगी सजावट
यंदाच्या वाढदिवसानिमित्त रुग्णालयात आकर्षक फुलपाखरूच्या संकल्पनेवर आधारित सजावट करण्यात आली होती. रंगीबेरंगी फुगे आणि आकर्षक सजावटीमुळे वातावरण उत्साहपूर्ण झाले होते. डॉक्टर, परिचारिका, रुग्णालयातील कर्मचारी, बालरुग्ण आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या उपस्थितीत रिद्धी-सिद्धींनी केक कापला. त्यानंतर या दोघींनी आनंदाने नृत्याविष्कार सादर केले. त्यांच्या उत्साहामुळे संपूर्ण परिसरात आनंद आणि सकारात्मकता पसरली. वाडिया रुग्णालयाच्या सातत्यपूर्ण पाठिंब्यामुळे रिद्धी-सिद्धी आत्मविश्वासाने त्यांचे आयुष्य जगत आहेत. प्रेम, योग्य ती काळजी आणि संधी मिळाल्यास प्रत्येक मुलाला एक सुंदर आयुष्य जगता येते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com