

दहावी परीक्षेचा
आज निकाल
मुंबई, ता. ७ ः राज्य शिक्षण मंडळाकडून फेबुवारी-मार्च २०२६ मध्ये घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेचा निकाल शुक्रवारी (ता. ८) दुपारी १ वाजता ऑनलाइन जाहीर केला जाणार असल्याची माहिती मंडळाचे सचिव डॉ. दीपक माळी यांनी दिली. यंदा मे महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात दहावीचा निकाल जाहीर होत असल्याने अकरावी आणि इतर प्रवेश प्रक्रियेसाठी विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. यंदा हा निकाल https://mahahsscboard.in या संकेतस्थळावर शाळांचा एकत्रित निकाल उपलब्ध होणार आहे. विद्यार्थ्यांना विषयनिहाय संपादित केलेले गुणही उपलब्ध होतील. त्याचप्रमाणे डिजिलॉकरमध्ये डिजिटल गुणपत्रिका संग्रहित करून ठेवण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे.
--
निकाल पाहण्यासाठी संकेतस्थळ
https://results.digilocker.gov.in
https://mahahsscboard.in
https://sscresult.mkcl.org
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.