अंबरनाथमध्ये अखेर शिवसेनेचा विजय; भाजपला मोठा धक्का !

अंबरनाथमध्ये अखेर शिवसेनेचा विजय; भाजपला मोठा धक्का !
Published on

अंबरनाथमध्ये अखेर शिवसेनेचा विजय; भाजपला धक्का!
शिवसेना महाविकास आघाडी गट वैध, राष्ट्रवादीच्या अश्विनी सचिन पाटील स्वीकृत नगरसेविका

अंबरनाथ ता. ७ (वार्ताहर) : अंबरनाथ नगरपालिकेतील गट वैधतेच्या बहुचर्चित राजकीय संघर्षाचा अखेर निकाल लागला असून, जिल्हाधिकाऱ्यांनी शिवसेना महाविकास आघाडी गटाला वैध ठरवत भाजपला मोठा राजकीय धक्का दिला आहे. या निर्णयानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या अश्विनी सचिन पाटील यांना स्वीकृत नगरसेविका म्हणून मान्यता देण्यात आली असून, शहराच्या राजकीय वर्तुळात या निर्णयाची जोरदार चर्चा सुरू आहे.

अंबरनाथ नगरपालिकेची डिसेंबर २०२५मध्ये निवडणूक झाली. या निवडणुकीत भाजपचा नगराध्यक्ष थेट जनतेने निवडून दिला. शिवसेना शिंदे गटासाठी हा सर्वात मोठा धक्का होता. या धक्क्यातून सावरत असतानाच भाजपने काँग्रेस नगरसेवकांना पक्षात विलीन करत करत आपले संख्याबळ वाढवले. ही अभद्र युती असल्याचे सांगत शिवसेना शिंदे गटाने ही भाजपच्या गोटात असलेल्या राष्ट्रवादी अजित पवार गटाचे चार नगरसेवक आपल्याजवळ केले. जानेवारी २०२६मध्ये याप्रकरणी न्यायालयात सुनावणी झाली. न्यायालयाने कोणता गट अधिकृत करायचा याचे सर्वस्वी अधिकार ठाणे जिल्हाधिकाऱ्यांना दिले. अखेर चार महिन्यांनंतर त्याची सुनावणी पूर्ण होत आता खऱ्या अर्थाने सत्तेचा निकाल लागला आहे. या संपूर्ण प्रकरणावर झालेल्या सुनावणीनंतर अखेर शिवसेना महाविकास आघाडी गट वैध असल्याचा निर्णय देण्यात आला. त्यामुळे अंबरनाथच्या राजकारणात शिवसेनेने मोठा राजकीय डाव यशस्वी केल्याची चर्चा रंगू लागली असून, भाजपसाठी हा मोठा धक्का मानला जात आहे.
----
नगराध्यक्षांनी पदाचा गैरवापर केल्याचा आरोप
याप्रकरणी झालेल्या सुनावणीनंतर शिवसेना महाविकास आघाडी गट वैध असल्याचा निर्णय देण्यात आला. माजी उपनगराध्यक्ष राजेंद्र वाळेकर यांनी हा निकाल अंबरनाथकरांच्या विश्वासाचा विजय असल्याचे म्हटले आहे, तर शिवसेना शहरप्रमुख अरविंद वाळेकर यांनी नगराध्यक्षांनी पदाचा गैरवापर केल्याचा आरोप केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com