कांजूरमार्ग कचराभूमीचे प्रकरण:

कांजूरमार्ग कचराभूमीचे प्रकरण:
Published on

अचानक रात्री दुर्गंधी कशी पसरली?
कांजूरमार्ग कचराभूमीप्रकरणी न्यायालयाची विचारणा 
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ७ : न्यायालयाच्या आदेशानंतर आणि देखरेखीनंतर थांबलेली कांजूरमार्ग कचराभूमीतील दुर्गंधी बुधवारी रात्रीपासून पुन्हा कशी सुरू झाली? अशी विचारणा गुरुवारी (ता. ७) उच्च न्यायालयाने मुंबई महापालिकेकडे केली. तसेच काही दिवसांच्या विश्रांतीनंतर अचानक सुरू झालेल्या या दुर्गंधी मागील नेमके कारण काय? महापालिकेसह महाराष्ट्र राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळानेही यावर देखरेख ठेवणे आवश्यक असल्याचे निरीक्षण न्यायालयाने नोंदवले.
मध्यरात्री एक ते सकाळी सहा या वेळेतच कचराभूमीवरून दुर्गंधी पसरत असल्याची तक्रारींची दखल न्यायालयाने मागील सुनावणीवेळी घेतली होती. या वेळेत कचराभूमीवर देखरेख ठेवून कारण शोधण्याचे आदेश दिले होते. दुर्गंधी कमी  करण्याबाबत उपाययोजना सुचवण्याचे आदेश तज्ज्ञ समितीला दिले होते. त्या पार्श्वभूमीवर कचराभूमी परिसरातील कमी झालेली दुर्गंधी अचानक एका रात्रीत पुन्हा परसणे हे न उलगडणारे कोडे असल्याचे निरीक्षणही न्या. गिरीश कुलकर्णी आणि न्या. आरती साठे यांच्या खंडपीठाने नोंदवले.
----
अनेकांचे आरोग्य धोक्यात
कचराभूमीवरून धोकादायक मिथेनचा उत्सर्जन केवळ परिसरातील नागरिकांसाठीच नव्हे, तर कचराभूमीवर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या आरोग्यासाठीही धोकादायक आहे. आम्हाला त्यांचाही जीव महत्त्वाचा असून, त्याकडे दुर्लक्ष करून चालणार नसल्याचेही न्यायालयाने अधोरेखित केले.
---
कांदळवने टिकतील?
कचराभूमीतून येणाऱ्या दुर्गंधीवर तोडगा म्हणून परिसरात बांबूची लागवड करण्याबाबत समितीच्या बैठकीत चर्चा झाल्याचे न्यायालयाने महापालिकेला आठवण करून दिली. मिथेन हा प्रचंड घातक वायू आहे. मास्कही त्यांचा धोका रोखू शकत नाही. त्यामुळे परिसरात केवळ कांदळवनच जगू शकतात का, याबाबत तज्ज्ञांचे मत घेणे आवश्यक असल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले.
----
एमपीसीबीवर ताशेरे
या समस्येवर पालिकेसह विशेषतः एमपीसीबीने अधिक लक्ष देणे गरजेचे आहे. कारण, हा मुद्दा त्यांच्याशी निगडित आहे. तरीही इतके दिवस एमपीसीबी काय करीत आहे, असा प्रश्न न्यायालयाने उपस्थित केला आणि एमपीसीबीच्या उदासीन कारभारावर ताशेरे ओढले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com