महापौरांच्या दौऱ्याआधी मालाड स्थानक परिसरात पालिकेचा बुलडोझर

महापौरांच्या दौऱ्याआधी मालाड स्थानक परिसरात पालिकेचा बुलडोझर
Published on

महापौरांच्या दौऱ्याआधी मालाड स्थानक परिसरात पालिकेचा बुलडोझर

मालाड, ता. १० (बातमीदार) : मालाड पश्चिम येथील नटराज मार्केटसमोरील अनधिकृत दुकानांवर बुधवारी सायंकाळी महापालिकेने मोठी तोडक कारवाई करत बुलडोझर फिरवला. या कारवाईत सुमारे २५ ते ३० दुकाने जमीनदोस्त करण्यात आली.
नटराज मार्केट परिसरात कपडे, चप्पल व इतर वस्तूंची अनेक अनधिकृत दुकाने उभारण्यात आली होती. या दुकानांवर यापूर्वीही पालिकेकडून अधूनमधून कारवाई करण्यात येत होती; मात्र ती कारवाई केवळ औपचारिक स्वरूपाची असल्याची चर्चा स्थानिकांमध्ये होती. या वेळी मात्र पालिकेने कठोर भूमिका घेत संपूर्ण दुकाने हटवली.
मिळालेल्या माहितीनुसार, गुरुवारी (ता. ७) महापौर मालाड परिसरातील नाल्यांची पाहणी करण्यासाठी येणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर वरिष्ठ पालिका अधिकारी स्वतः कारवाईवेळी उपस्थित होते. अधिकाऱ्यांनी जातीने निरीक्षण करत अतिक्रमण हटवण्याची मोहीम राबवली.
या कारवाईनंतर परिसरातील अनधिकृत फेरीवाल्यांमध्ये घबराट पसरली असून, पुढील काही दिवसांत आणखी कारवाया होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com