

पुनर्विकासाच्या कामादरम्यान मुलुंडमध्ये गॅस गळती; पुरवठा बंद
मुलुंड, ता. ११ (बातमीदार) : मुलुंड पश्चिमेतील एन. एस. रोड येथे शुक्रवारी सकाळी मुलुंड पोलिस ठाण्यासमोरील रस्त्यावर गॅस गळतीची घटना घडली. त्यामुळे परिसरात काहीकाळ चिंतेचे वातावरण निर्माण झाले होते.
येथील एका जुन्या इमारतीचा पुनर्विकास सुरू असून, त्या ठिकाणी सुरू असलेल्या कामादरम्यान जमिनीखालील गॅस लाइनमधून गळती झाल्याचे नागरिकांच्या निदर्शनास आले. जागरूक नागरिकांनी तातडीने महानगर गॅस लिमिटेडच्या अधिकाऱ्यांना याची माहिती दिली.
माहिती मिळताच अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. कोणतीही दुर्घटना घडू नये, यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून परिसरातील गॅसपुरवठा तत्काळ बंद करण्यात आला. सध्या गॅस गळती रोखण्याचे काम युद्धपातळीवर सुरू असून, परिस्थिती नियंत्रणात असल्याची माहिती मिळाली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.