

पोयनाड बसस्थानकात आरक्षण सुविधा नसल्याने प्रवाशांची गैरसोय
पोयनाड, ता. ७ (बातमीदार) : अलिबाग तालुक्यातील पोयनाड बस स्थानकात आरक्षण सुविधा उपलब्ध नसल्याने प्रवाशांची मोठी गैरसोय होत आहे. पोयनाड ही जिल्ह्यातील एक महत्वाची बाजारपेठ आहे. येथून येजा करणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठी असते. अलिबाग येथून सुटणाऱ्या एसटीच्या गाड्यांचे पूर्वी पोयनाड येथून ५ जागांचे आरक्षण येथील आरक्षण केंद्रावरून व्हायचे मात्र ही सुविधा एसटी महामंडळाने बंद केल्याने प्रवाशांना एसटी च्या आरक्षणासाठी गैरसोयीचा सामना करावा लागत आहे.
पोयनाड बसस्थानकात आरक्षण व एसटी पास सुविधा केंद्र आहे. मात्र येथे सध्या शालेय विद्यार्थ्यंसाठी एसटी पास सुविधा वितरण सुरू आहे. याआधी येथून सध्या एसटीसाठी ५ रुपयांचे तर हिरकणी (निमआराम) साठी ७ रुपयांचे आरक्षण व्हायचे. अलिबाग येथून सध्या मुंबई, ठाणे, पुणे, शिर्डी, धुळे, जळगाव, सातारा, अक्कलकोट, पंढरपूर, शेगाव, तुळजापूर, भगवानगड, गहिनीनाथ गड, लातूर, छत्रपती संभाजीनगर, कुरुंदवाड, शिरपूर ह्या बसगाड्या दररोज धावतात. या गाड्यांमध्ये पूर्वी पोयनाड येथून ५ जागांचे आरक्षण पूर्ववत सुरु करावे व ते पोयनाड येथील एसटी पास केंद्रावर उपलब्ध व्हावे. तसेच आधुनिकीकरणाकडे वाटचाल करणाऱ्या एसटी महामंडळाकडे पोयनाड येथील बस स्थानकात संगणकीकृत आरक्षण पूर्ववत करावे अशी मागणी प्रवाशांकडून होत आहे.
चौकट :
- आरक्षण सुविधा गरजेची
पोयनाड बसस्थानकातून लांब पल्ल्याच्या गाडयांना पूर्ववत ५ रुपयांचे किंवा पूर्ण आसन आरक्षित होईल असे संगणकीकृत आरक्षण उपलब्ध व्हावे. सध्या ऑनलाईन बुकिंगची नवीन पद्धत आलेली असली तरी सर्वांनाच हे शक्य नाही. त्यामुळे संगणकीकृत आरक्षण पोयनाड स्थानकातून अलिबाग आगारामार्फत सुरु व्हावे ही मागणी आता जोर धरत आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.